"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
 
== बालपण ==
[[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल]] आणि [[कमला नेहरू|कमला]] या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे [[काश्मिरी पंडित]] होते. इंदिरांचे आजोबा [[मोतीलाल नेहरु]] व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करून यात आपले योगदान दिले.
 
१९३६ मध्ये कमला नेहरु यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षणही सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://news.bbc.co.uk/local/oxford/hi/people_and_places/arts_and_culture/newsid_8661000/8661776.stm|शीर्षक=Oxford University's famous south Asian graduates |प्रकाशक=बीबीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=३१ ऑक्टोबर, २०१२}}</ref> याच दरम्यान त्या लंडन स्थित इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून मुक्ती साठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख [[फिरोज गांधी]] या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्यांनी विवाह केला.