"लिंकिन पार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: लिंकिन पार्क अगॉरा हिल्स, कॅलिफोर्निया येथील एक अमेरिकन रॉक बँड...
(काही फरक नाही)

१७:१५, ८ जुलै २०१४ ची आवृत्ती

लिंकिन पार्क अगॉरा हिल्स, कॅलिफोर्निया येथील एक अमेरिकन रॉक बँड आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या ह्या बँडने ६ कोटींपेक्षा जास्त अल्बम्स विकले आहेत आणि दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचा पहली अल्बम, हायब्रिड थिअरी पासूनच त्यांना मुख्यप्रवाहात यश मिळाले. त्याला २००५ साली आर.आय.ए.ए. (RIAA) द्वारा हीरक म्हणून प्रमाणित केले गेले. ह्यानंतरच्या स्टुडिओ अल्बम मिटिओरा ने बँडचे यश कायम राखले. २००३ सालच्या बिलबोर्ड २०० अल्बम चार्टमध्ये हा अल्बम प्रथम स्थानी होता. बँडच्या जगभरातील व्यापक दौर्‍यांमुळे आणि सेवाभावी प्रदर्शनांमुळे ते पुढे गेले. २००३ साली एमटीव्ही२ ने लिंकिन पार्कला म्युझिक व्हिडिओ युगाच्या सहाव्या स्थानी सर्वाधिक महान आणि ओएसिस आणि कोल्डप्लेनंतर, नव्या शतकाच्या सर्वश्रेष्ठ तिसर्‍या स्थानी नामित केले. हाइब्रिड थिअरी आणि मिटिओरामध्ये नु मेटल आणि रॅप रॉक शैलींना रेडिओसाठी अनुकूल, पण सघन-स्तरित शैलीत अंगिकारल्यानंतर बँडने त्यांच्या पुढील स्टुडियो अल्बम मिनट्स टू मिडनाइट मध्ये इतर शैलींवर प्रयोग सुरू केले. अल्बम बिलबोर्ड चार्टमध्ये सर्वांत वर होता व त्यावर्षीच्या इतर सर्व अल्बमपैकी तीसरा सर्वश्रेष्ठ सप्ताह ठरला. त्यांचा नवा अल्बम अ थाउझंड सन्स ८ सप्टेंबर २०१० साली रिलीझ झाला. त्यांनी अनेक इतर कलाकारांसोबत मिळून, विशेषतः रैपर जे-झी सोबत, त्यांचा मॅशअप एल्बम कोलिशन कोर्स और अनेक इतर कलाकारांसोबत रीअ‍ॅनिमेशन वर काम केले. ह्या जगातील सहस्राब्दि नंतर बनलेल्या अशा संगीत रचना आहेत, ज्यांच्या जगभरात ५ कोटीपेक्षा जास्त रेकॉर्ड्सची विक्री झाली आहे.