"ऐतरेय ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q4699299
No edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''ऐतरेय ब्राह्मण''' [[ऋग्वेद|ऋग्वेदाच्या]] संहितेतील ब्राह्मणग्रंथांपैकी एक आहे. [[ऋग्वेद]], [[यजुर्वेद]], [[सामवेद]] आणि [[अथर्ववेद]] हे चार वेद जगातल्या सर्वात जुन्या वाङ्‌मयात मोडतात. प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा असून काहींचे उपवेददेखील आहेत. ऋग्वेदाच्या २१ शाखांपैकी १९ लुप्त झाल्या असून शाकल व बाष्कल अश्या फक्त दोनच शाखा शिल्लक आहेत. ऋग्वेद संहितेत एकूण १०,५५२ मंत्र आहेत(बाष्कल शाखेत निराळे १५ मंत्र अधिक आहेत). 'संहिता' हा वेदाचा हा मुख्य भाग असतो. त्याशिवाय ब्राह्मणे आणि [[आरण्यक|आरण्यके]] हे आणखी दोन भाग असतात. आरण्यकाचा शेवटचा उपभाग म्हणजे [[उपनिषद]] होय. आरण्यकांचे पठण अरण्यात बसून करायचे पण उपनिषदाचे गुरूच्या शेजारी बसून करतात. ब्राह्मणग्रंथ म्हणजे गद्य साहित्य होय. त्यात विविध यज्ञ कसे करायचे ते सांगितलेले असते. यज्ञातील प्रधान आणि अंगभूत कर्मे-त्यांची विविध नावे, कर्माची साधने, यज्ञाचे अधिकारी व यज्ञाची विविध फले यात सांगितली असतात. देव, असुर ऋषी इत्यादिकांच्या कथा यात असल्या तरी या वाङ्‌मयातील बराचसा भाग रूक्ष आणि कंटाळवाणा वाटू शकतो. तरीसुद्धा वेदांपासून संस्कृतभाषेच्या झालेल्या परिवर्तनाचा अखंड इतिहास ब्राह्मणग्रंथांवरून समजतो. ऐतिहासिक भाषाशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहण म्हणून याला फार महत्वमहत्त्व आहे.
 
ऋग्वेदाची '''ऐतरेय ब्राह्मण''' व कौषीतकी ऊर्फ शांखायन ब्राह्मण, त्यांची आरण्यके आणि त्यांना जोडलेली '''ऐतरेय''' व कौषीतकी ही उपनिषदे सर्वच उपलब्ध आहेत.