"पतंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
पतंग पातळ [[ताव]] व [[बांबू|बांबूच्या]] कामट्या वापरुन बनवितात.हिला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चकरीचक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच 'मांजा'काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो.
[[चित्र :Kite shop in Lucknow.jpg|right|thumb|पतंगीच्या दुकानाचे दृश्य]]
[[गुजरात]]मध्ये [[अमदाबाद]] येथे 'उत्तरायण' या नावाने पतंग महोत्सव साजरा होतो.
==इतिहास==
पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग [[चीन]]मध्ये उडवला गेला असे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रॅन्कलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये [[विद्युत उर्जा]] असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. [[भारत|भारतात]] [[संक्रात|संक्रातीला]] व २६ जानेवारीला पतंग उडवण्याची प्रथा आहे.
==कार्य==
पतंग हा एक पंखच आहे. पतंगाला दोन समान भाग असतात. हे भाग सारख्या आकाराचे असल्याने पतंग समतोल बनतो. पतंगाच्या काड्या, शेपूट व आकार यावर पतंग कसा उडेल हे ठरते. पतंग हवेमुळे वर आकाशात जातो. [[वारा|वाऱ्याचा]] वेग मर्यादित स्वरूपात असेल तर पतंग चांगले उडतात. पतंगाचे निमुळते टोक त्याला हवेत वर जाण्यास मदत करते. वर जातांना पतंगाचा उडण्याचा कोन वाऱ्याला अडवतो व त्याचे दोन भाग करतो. पतंगाच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. पतंगाच्या खालील बाजूला जास्त दाबाचा पट्टा म्हणजेच हवेची उशी तयार होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पतंग" पासून हुडकले