"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ ४४:
}}
[[चित्र:इंदिरा गांधी.jpg|200px|इंदिरा गांधी|thumb|left]]
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १९]],[[इ.स. १९१७]] - [[ऑक्टोबर ३१]],[[इ.स. १९८४]]) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
 
[[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या लढाईवेळी त्यांना [[मोरारजी देसाई]] यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी [[पोखरण]] येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
 
इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|राष्ट्रीय काँग्रेसमध्ये]] प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. शास्त्रीजींचा [[ताश्कंद]] येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज यानी पाठिंबा देऊन ३५५ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी , [[ऑपरेशन ब्लू स्टार|ऑपरेशन ब्ल्यू स्टार]] या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
 
१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेतून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.
 
== बालपण ==
ओळ ६४:
'''भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद:'''
 
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला. आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
 
'''माहिती व नभोवाणीमंत्री:'''
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर [[लाल बहादूर शास्त्री]] पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या [[मद्रास]] राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. [[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५ चे भारत-पाक युद्ध]] या दरम्यान त्या [[श्रीनगर]] च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा [[दिल्ली]] येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
 
[[पाकिस्तान|पाक]] आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद]] येथे पाकिस्तानचे [[अयुब खान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिला महिला पंतप्रधान झाल्या.
ओळ ७३:
== पंतप्रधान ==
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
 
== १९७१ चे भारत पाक युद्घ ==
ओळ ९२:
{{भारतरत्न}}
 
{{DEFAULTSORT:गांधी, इंदिरा}}
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री|गांधी, इंदिरा]]
[[वर्ग:भारतीयभारताचे पंतप्रधान|गांधी, इंदिरा]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
Line ११३ ⟶ ११२:
[[वर्ग:हत्या झालेले भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
 
{{DEFAULTSORT:गांधी, इंदिरा}}
 
{{Link FA|ml}}