"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
== इतिहास ==
[[इ.स. १४९७]] साली [[पोर्तुगाल]]चा राजा इमॅन्युअलने [[आफ्रिका खंड|आफ्रिका खंडाला]] प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी [[वास्को दा गामा|वास्को द गामा]] याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यानेकिनाऱ्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स'<ref group="श">{{lang-en|Cape of Storms}}, {{lang-mr|वादळाचे भूशिर}}</ref> असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून '[[केप ऑफ गुड होप]]'<ref group="श">{{lang-en|Cape of Good Hope}}, {{lang-mr|आशेचे भूशिर}}</ref> असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनार्याने [[मोझांबिक]] येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन [[अरबी समुद्र|अरबी समुद्रातून]] प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनार्यावरकिनाऱ्यावर पोहोचला. [[कालिकत]]पासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड<ref group="टीप">कप्पड बीच - येथील एका दगडी स्तंभावर वास्को द गामाने त्याची जहाजे नेमकी कोठे नांगरली याचा थोडक्यात उल्लेख आहे.</ref> या लहानशा खेड्यात त्याने [[१७ मे]], [[इ.स. १४९८]] रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे [[युरोप]]कडून भारताकडे थेट येणार्यायेणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला.
 
कालिकतचे हिंदू राज्य प्राचीन चेरा साम्राज्याच्या अकरा वारसा राज्यांपैकी एक होते. वास्को द गामा कालिकतला आला त्यावेळी तिथला शासक नेडीयिरुप्पू स्वरुपमस्वरूपम 'झामोरीन' या त्याच्या आनुवांशिक बिरुदावलीने ओळखला जात होता. झामोरीनच्या राज्यातील कालिकत हे बंदर असलेले शहर मसाल्याच्या व कापडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सागरी व्यापारामुळे समृद्ध असलेल्या कालिकतचे झामोरीन हे सार्वभौम शासक होते व त्यांनी जवळजवळ आठ शतके त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखलेले होते. त्यांनी दिल्लीच्या [[मुघल साम्राज्य|मुघल]] प्रभुत्वाला कधीही मान्यता दिलेली नव्हती. ते त्यांच्या आदरातिथ्य, धार्मिक सहिष्णुता आणि सर्व देशांच्या व्यापार्यांना आश्रय देण्याबद्दल प्रसिद्ध होते. परकीय व्यापार्यांनाव्यापाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत व दलालांसमवेत राहता यावे म्हणून झामोरीनच्या प्रभावक्षेत्रातील समुद्रकिनारपट्टीवर त्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
 
पोर्तुगालला परतण्यापूर्वी वास्को द गामाने कालिकत येथे तीन महिने वास्तव्य केले. त्याला त्याची ही मोहिममोहीम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली. या मोहिमेत त्याच्या ११५ खलाशांना प्राण गमवावे लागले. त्याचे एक जहाज बुडाले आणि दुसर्याचेदुसऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले. तो दोन जहाजांसह मायभूमी पोर्तुगालला परतला. त्याच्या दोन्ही जहाजातजहाजांत भारतीय माल पूर्णपणे भरलेला होता. या मोहिमेत सर्व खर्च वजा जाता वास्को द गामाला साठपट फायदा झाला. वास्को द गामाच्या या यशस्वी मोहिमेचे जगभर दूरगामी परिणाम झाले.
 
वास्को द गामाने शोधलेल्या नवीन सागरी मार्गामुळे दळणवळणाच्या माध्यमातून पश्चिम युरोपातील देश पूर्वेच्या जवळ आले आणि पाश्चात्यपाश्चात्त्य सत्तांच्या वसाहतवादाला चालना मिळाली व युरोपच्या भारत व दक्षिण-पूर्व आशियाशी चालणार्याचालणाऱ्या व्यापारावर एकाधिकार प्रस्थापित करण्याची संधी पोर्तुगीजांना मिळाली. यामुळे युरोपच्या पूर्वेकडील देशांशी असलेल्या व्यापारावर [[इटली]]चा जो एकाधिकार होता त्यालाही धक्का बसला. नवीन समुद्री मार्गाच्या शोधाने भारतही जागतिक राजकारणात गुंतला आणि युरोपीय देशांच्या विस्तारवादाला बळी पडला. सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच आले.
 
== पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा ==