"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३९:
विटा या लहान गावात प्राचार्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजश्री शाहू महाराजांच्या बोर्डिंगाच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. भाऊ बाबासाहेब यांच्याबरोबर साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.
==कारकीर्द==
....वर्ष ते ....वर्ष साताऱ्यात वकिली केली.
 
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
 
१९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] कुलगुरुपद सांभाळले.
 
==वत्कृत्व==
शिवाजीराव भोसले एक सुपरिचीत व्याख्याते होते.भारतीय तत्वज्ञान,भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज,मराठी संत,तर्कशास्त्र, मानसशास्त्र,साहित्य इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत.