"मदर तेरेसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो शब्द पर्याय सगाआ
ओळ २:
{{दृष्टिकोन}}
{{कॉपीपेस्ट | लेख | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=95962:2010-08-25-15-45-43&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7 | दिनांक = १४ सप्टेंबर, इ.स. २०११ }}
२६ ऑगस्ट, इ.स. १९१० रोजी अल्बानियात जन्मलेल्या मुलीचा हा प्रवासच मुळी थक्क व्हायला भाग पाडणारा आहे. भारत हा देश या मुलीने आपला मानला आणि नंतरच्या काळात ‘मदर’ ही उपाधी सर्वार्थाने सार्थकी लावणाऱ्या तेरेसांनी कोलकाता या शहराला आनंदनगरी ही ओळख दिली. महात्मा गांधी यांचे नाव घेतले, की ज्याप्रमाणे भारताच्या तत्त्वज्ञानाचा आरंभ होतो, तसेच मदर तेरेसा यांचे नाव उच्चारले, की भारताचा इतिहास जागतिक पटलावर उभा राहतो. स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर मदर तेरेसांनी कोलकात्यात आपल्या कामाला प्रारंभ केला तेव्हा त्यांनी भीषण दंगली पाहिल्या, हजारो जणांना प्राण सोडतानाही अनुभवले. अनेकांचे टाहो त्यांनी ऐकले, किंकाळय़ा ऐकल्या. तो काळ अशांततेचा होता. फाळणीनंतर द्वेष, हिंसाचार, मारामाऱ्या यांचे कोलकात्यावरच काय संपूर्ण देशावरच अधिराज्य होते. अशा वेळी त्यांनी गरिबातल्या गरिबापर्यंत जाऊन काम करण्याचा निर्धार केला. आपला नेहमीचा पोशाख बदलून त्या सफाई कामगाराप्रमाणे सुती साडी नेसून रस्त्यावर उतरल्या. येशू ख्रिस्ताच्या डोळय़ांमध्ये जे कारुण्य दिसते, त्याचेच प्रतिरूप मदर तेरेसांच्या ठायी आपण अनुभवले आहे. अगदी अलीकडच्या काळात प्रमुख निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त झालेले नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार! त्यांनाही तेरेसा यांनी नाही, होय करत अखेरीस चरित्र लिहायला परवानगी दिली. त्यांनी ते लिहिले म्हणून त्यांच्यावर आधीचे निवडणूक आयुक्त जे. एम. (जेम्स मायकेल) लिंगडोह यांच्याप्रमाणे कडवट टीकाही झाली. यावरूनही आपल्या देशात वावरणाऱ्या जात्यंध हिंदुत्ववाद्यांची वृत्ती किती संकुचित आहे ते स्पष्ट होते. चावलांनी एकदा तेरेसांचा उल्लेख ‘जगातली सर्वात शक्तिशाली महिला’ असा केला, तेव्हा त्या त्यांना म्हणाल्या, ‘मी खरोखरच तशी असते तर मी जगात शांतता प्रस्थापित करू शकले असते.’ चावलांनी त्यांना मुलाखतीसाठी बराच आग्रह केला, तेव्हा त्यांनी ते प्रश्न बाजूला करून म्हटले, की आता मला निघायला हवे. तुम्ही आमच्या असंख्य ‘घरां’ना भेटी दिल्या असतील, तिथे आमच्या ‘सिस्टर्स’ अशाच पद्धतीच्या साडय़ा नेसून काम करताना तुम्ही पाहिलेही असेल, त्या साधे जेवण घेतानाही तुम्ही पाहिले असेल, पण मदर तेरेसा सगळीकडे कुठे असतात, तरीही काम चालतेच. आम्ही गरिबातल्या गरिबाच्या सेवेत मग्न आहोत, तोपर्यंत या कामाला काही कमी पडणार नाही.’ आपण आणि आपले काम यापलीकडे काहीही न पाहणाऱ्या मदर तेरेसा यांनी आपल्याला रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी रांगेत उभे राहून वेळही काढावा लागतो, असे प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांना सहज म्हटले, तेव्हा खुशवंतसिंगांनी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहून मदर तेरेसांना रेल्वेचा संपूर्ण देशाचा पास देण्याविषयी कळवले. त्यावर इंदिरा गांधींनी त्यांना विमानाचा पास काढून दिला. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा बकवासतथ्यहीन होताहोत्या. आपण कोणतेच सामाजिक कार्य करायचे नाही आणि जे कोणी ते करत असतील, त्यात मोडता घालायचा, ही वृत्तीच याही ठिकाणी दिसली आहे. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.
 
कोलकात्याच्या आणि लंडनच्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी आपल्या अनाथालयासाठी भाजीपाला आणि अन्नधान्य यांची अक्षरश: भीक मागितली आहे. कोलकात्यातच रामकृष्ण मिशनने यासारखे काम केले आहे, पण अशा कामांना स्वत:ला वाहून घेणाऱ्या संस्था फारच रोडावल्या आहेत. आज तर त्यांची संख्या नगण्य वाटावी अशीच आहे. मदर तेरेसांनी गरिबीला उघडय़ावर संसार करण्यापासून रोखले आणि आपल्या घरात आणून ठेवले. सर्वसाधारण मनुष्यस्वभाव हा जास्तीत जास्त मिळवायच्या मागे लागलेला असताना, त्यांनी समाजासाठी सर्वस्व पणाला लावले होते. जो दारिद्रय़ात आहे, ज्याला कुणीही नाही, जो मृत्यूचीच वाट पाहतो आहे, अशांना त्यांनी आधार दिला आणि त्यांचे जीवन आणि मरणसुद्धा त्यांनी सुसहय़ बनवले. अनेक अंधांना शारीरिकदृष्टय़ा नसले तरीही त्यांनी डोळस केले. ही त्यांची जादूविद्या नव्हती, त्यांच्यातल्या माणुसकीचा तो सर्वोच्च गुणधर्म होता. रस्त्यावर टाकून दिलेल्या, कचराकुंडीत सोडून दिलेल्या हजारो जिवांना त्यांनी ‘आयुष्यमान भव!’ हा आशीर्वाद दिला, त्याचे जीवन सुखावह केले. अनेक मरणासन्न जिवांना काळाच्या तावडीतून सोडवून त्यांनी पुनर्जन्म दिला. तो जो कुणी आहे, त्याचा धर्म कुठलाही असो, त्याला त्याच्या धर्माप्रमाणे शांतताही लाभू दिली. ज्यांनी आयुष्यातही कधी अंघोळ पाहिली नाही, अशांना हाताने स्पर्श करून त्यांनी अंघोळ तर घातलीच, पण त्यांच्या जखमाही धुतल्या. तो वा ती यांच्यापैकी कुणी यातनांनी विव्हळलेच तर ‘सॉरी’ या शब्दांनी त्यांना धीर दिला. त्यांना ताजेतवाने बनवले. ‘एचआयव्ही’बाधितांनाही त्यांनी हे जीवन सुंदर असल्याचा साक्षात्कार घडवला. कुष्ठरोगी आणि असंख्य रुग्णांची त्यांनी केलेली सेवा ही अपूर्व अशीच होती. या अशा अनेक जिवांसाठी त्याही वणवण भटकल्या. त्या म्हणतात, की मी हिंडले हे ठीक आहे, पण मी तशी हिंडले नसते तर मला त्यांची ही व्यथा कशी समजली असती?