"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lt:Draupadė
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|200px|हस्तिनापूरविराट राजाचा दरबारात दु:शासन व दुर्योधनकीचकाकरवी यांच्याकरवीअपमानित विटंबिलेलीझालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]]
'''द्रौपदी''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती [[पांचाल|पांचालाच्या]] राजा [[द्रुपद|द्रुपदाची]] दत्तक कन्या व पाच [[पांडव|पांडवांची]] पत्नी होती. महाभारतीय युद्धानंतर [[कौरव|कौरवांवर]] विजय मिळवून [[युधिष्ठिर]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा बनल्यावर द्रौपदी राणीपट्टराणी झाली.
 
सम्राट द्रुपदाने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टध्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती.
 
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बर्‍याचदा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती पांचाल राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई. अज्ञातवासामधे द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी.
 
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.
 
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने गृहीणीपद व पतिची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात.
 
द्युतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन व दु:शासनाकरवी झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धीमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. मात्र युधिष्ठीराच्या द्युतलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे देखील लागले.
 
या प्रसंगानंतरच द्रौपदीने अशी शपथ घेतली होती की तिच्या केसांना धरून ओढणार्‍या दु:शासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. तिची ही शपथ भीमाने कायम लक्षात ठेवली होती. महाभारत युद्धामधे दु:शासनाचा वध केल्यानंतर भीमाने आपल्या हाताच्या ओंजळीमधे दु:शासनाचे रक्त गोळा करून ते द्रौपदीस आणून दिले होते.
 
द्रौपदीने पणानंतर अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करण्यारा पति म्हणजे भीम. द्युतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याणे युद्धात दुर्योधनाची मांडी फोडली होती. वनवासामधे तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिचा अवमान करू पाहाणार्‍या कीचकाचा वध करण्याचं काम भीमानेच केलं होतं.
 
द्रौपदीला प्रत्येक पांडवापासून एक-एक पुत्र झाला होता परंतु दुर्दैवाने द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा याने एके रात्री या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते.
 
== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले