"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३९:
या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात.
 
ग्रंथालय चळवळीत निरपेक्ष वृत्तीने आणि सामाजिक कर्तव्यभावनेने कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. एखादी चळवळ चार-दोन माणसांच्या नियमबाह्य वर्तनामुळे बदनाम करण्याची वृत्ती योग्य नाही. अनेक ग्रंथालये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजजीवन समृद्ध करीत असतात. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.{{संदर्भ हवा}} केंद्र सरकारने नॉलेज कमिशन नेमून ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी नवीन धोरण तयार केले. ज्ञानाधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रंथालय चळवळ निकोप आणि वर्धिष्णू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील 75 टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत. राज्यात 12,859 ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत 22,678 ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार 20 हजार, ‘क' वर्गासाठी 64 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख 28 हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख 92 हजार रुपये अनुदान देते. हे अनुदान एक एप्रिल 2012 पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा 926 रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून 2964 रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांना मिळून दरमहा 5926 रुपये पगार मिळतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा 8889 रुपये पगार मिळतो. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या 10 टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणगीमधून जमा करून अनुदानाच्या रकमेत भर टाकावी लागते. सर्वसाधारणपणे निम्मी रक्कम वेतनावर खर्च होते आणि निम्मी रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इ. साठी खर्च होते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार 1500 रु. होणार. एवढ्या तुटपुंज्या पगारात सुमारे निम्म्या वाचनालयांतील सेवक काम करतात. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतन नाही.
 
सातारा जिल्ह्यामध्ये 435 ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसित होत आहे. महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिक वेगाने विकसित झाली पाहिजे. या चळवळीच्या संवर्धनासाठी ‘पडताळणी' ही एक सुवर्णसंधी आहे, असे वातावरण निर्माण व्हावे.
 
 
बदलत्या काळानुसार मुलांचे ग्रंथ संग्रहालय हायटेक होणार आहे. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळवता येणार आहे. नवीन वर्षांत २४ तास सुरू असणारी अभ्यासिका देखील सुरू करण्यात येणार आहे.
 
शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशात न मोजता येणारी बौद्धिक संपत्ती लाभली आहे. ही सारी चळवळ सुरू कशी झाली, कानाकोपऱ्यात कशी पोहोचली आणि आज या टप्प्यापर्यंत कशी आली हा साराच उद्बोधक आणि रंजक असा इतिहास आहे. प्राचीन काळात राजे-राजवाडय़ांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल.
Line ५४ ⟶ ४९:
 
प्रबोधना साठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरु व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. अनुदानाचा विनियोग योग्यप्रकारे होतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नुकतीच वाचनालयाचीही विशेष तपासणी झाली. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. {{संदर्भ हवा}}
 
जयसिंगपूर येथील पाटील परिवार अजून जगावेगळा एक प्रयोग करत असून मागील काही वर्षा पासून मी जयसिंगपूर येथून संपूर्णपणे मोफत वाचनालय चालवत आहेत (युनिवर्सल फ्री लायब्ररी) युनिवर्सल फ्री लायब्ररी, जयसिंगपूर चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे एक उत्तम वाचक असून ते अगदी लहानपणी अ आ ई वाचायला शिकल्या पासून विविध विषयावरील पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. त्यांच्या आयुष्यातील यशाचे गमक म्हणजे त्यांचे चौफेर वाचन आहे. वाचन हे त्यांचे एक व्यसन / वेड आहे. त्यांना रोज एक नवीन पुस्तक वाचायला पाहिजे असते, अगदी कुठही असले तरी ते दररोज वाचन करतातच.
 
==इतिहास==