"ख्मेर रूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात ख्मेर रूजने कंबोडियामध्ये हिंसेचे व अराजकतेचे थैमान घातले. पोल पोटने कंबोडियामधील सामाजिक पातळ्या हटवून सर्व जनतेला [[शेती]]च्या कामास जुंपण्याचे ठरवले. ख्मेर रूजने सर्व शहरी नागरिकांना खेडेगावांत स्थलांतर करण्यास भाग पाडले. ज्या शहरी लोकांना शेतीचे काहीही ज्ञान नाही अशांना बळजबरीने शेतकरी बनवल्यामुळे कंबोडियामधील कृषी उद्योग पूर्णपणे कोलमडून पडला व भयंकर [[दुष्काळ]]ाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच अन्न-पाण्याविना सलग १२ तास शेतीकाम करण्याच्या ख्मेर रूजच्या धोरणामुळे भुकमारी, रोगराई इत्यादी कारणास्तव लाखो लोक मृत्यूमुखी पडले. कोणताही छोटासा नियम मोडल्यास त्या व्यक्तीला त्वरित मारून टाकले जात असे.
 
तसेच ख्मेर रूजने कंबोडियामधील सर्व शाळा, माहाविद्यालये, इस्पितळे, बॅंका बंद केल्या व बहुसंख्य शिक्षकांची व विचारवंतांची हत्या केली. चलनास विरोध व्यक्त करून त्यांनी कंबोडियामधील सर्व नोटा जाळून टाकल्या व बॅंका जमीनदोस्त केल्या. ह्यामुळे कंबोडियाची अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. ख्मेर रूजने कंबोडियामधील धर्मांचे पुरते उच्चाटन करण्याचे ठरवून सर्व प्रार्थनागृहे व धर्मदायी संस्था बंद केल्या. कोणतीही व्यक्ती धर्माचे पालन करताना आढळून आल्यास ठार मारली जात असे. तसेच कंबोडियन जनतेच्या कोणत्याहीसर्व प्रकारच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर संपूर्ण बंदी आणली गेली.
 
ख्मेर रूजच्या तांडवामध्ये सुमारे १२ लाख ते ३० लाख कंबोडियन लोक मृत्यूमुखी पडले असवेत असा अंदाज अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्मेर_रूज" पासून हुडकले