"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६:
१९२५ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटी स्थापनेनंतरची पन्नास वर्षे पूर्ण करणार होती. या काळात कृष्णमूर्तींच्या मसिहासदृश व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या चर्चांना ऊत आला. थिऑसोफिकल सोसायटीत राजकारण सुरू झाले. अनेक सभासद आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याचे बोलू लागले आणि इतर अनेक त्यावर शंका घेऊ लागले. अशा घटनांमुळे खुद्द कृष्णमूर्ती मात्र मनाने सोसायटीपासून दूर गेले.
 
१३ नोव्हेंबर १९२५ रोजी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नित्यानंदांचे [[शीतज्वर]] व क्षयाच्या प्रादुर्भावांमुळे निधन झाले. नित्यानंद आजारग्रस्त असले तरी त्यांचा मृत्यू अनपेक्षित होता. या घटनेमुळे कृष्णाजींचा थिऑसॉफीवरील व सोसायटीच्या नेत्यांवरील विश्वास उडाला. नित्यानंदांच्या तब्येतीबद्दल कृष्णाजींना वारंवार आश्वस्त केले जात होते. आपल्या जीवितकार्यासाठी नित्यानंदाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू होणार नाही असे अ‍ॅनीबाईंसह कृष्णाजींना वाटत होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या बातमीने कृष्णमूर्ती जवळपास कोसळले. नित्याच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी मात्र ते "अतिशय शांत, तेजस्वूतेजस्वी आणि सर्व भावनांमधून मुक्त" झाल्यासारखे वाटले.
 
नित्यानंदांच्या मृत्यूमुळे "विश्वगुरूचे आगमन" वगैरे चर्चा बंद झाल्या.