"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १५:
 
==शोध==
एप्रिल १९०९ मध्ये लेडबीटर व कृष्णमूर्तींची पहिली भेट झाली. लेडबीटर हे आपल्याला अतींद्रिय दृष्टी असल्याचा दावा करणारे गृहस्थ होते. अड्यार नदीच्या किनारी हे दोघेही नेहमी जात. लेडबीटरच्या म्हणण्यानुसार कृष्णमूर्तींचे प्रभामंडल (''ऑरा'') त्यांनी पाहिलेल्या सर्वोत्तम प्रभामंडलांपैकी एक होते आणि त्यात स्वार्थाचा लेशही नव्हता. लेडबिटरच्या मते कृष्णमूर्तींमध्ये आध्यात्मिक गुरू व उत्कृष्ट वक्ता बनण्याची पात्रता होती. थिऑसॉफीतील एका सिद्धांतानुसार मानवजातीच्या उत्क्रांतीला दिशा देण्यासाठी एक प्रगत आध्यात्मिक शक्ती नियतकालाने पृथ्वीवर येते आणि विश्वगुरू म्हणून कार्य करते.<ref>Lutyens (1975), p. 21.</ref> हे सामर्थ्यही कृष्णमूर्तींमध्ये लेडबीटरला दिसले.
 
या "शोधा"नंतर अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांनी कृष्णमूर्तींना विशेष वागणूक देण्यास आरंभ केला. अपेक्षित विश्वगुरूपदासाठी "माध्यम" म्हणून कृष्णमूर्तींच्या शिक्षणाची, संरक्षणाची आणि तयारीची जबाबदारी लेडबिटर व त्याच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी घेतली. कृष्णमूर्ती (यांना नंतर कृष्णाजी असेही म्हटले जाई) आणि त्यांचा धाकटा भाऊ नित्यानंद (नित्या) यांना खाजगी शिकवणी देण्यात आली व नंतर परदेशातील शिक्षणादरम्यान युरोपीय उच्चभ्रू समाजाशी त्यांचा परिचय करवून देण्यात आला. शाळेतील गृहपाठ पूर्ण न करू शकणारे आणि क्षमतांबद्दल व आरोग्याबद्दल अनेक अडचणी असणारे कृष्णाजी सहा महिन्यातच इंग्रजी बोलू आणि लिहू लागले. कृष्णाजींच्या मते लेडबिटरला लागलेला त्यांचा "शोध" ही त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढवला असता.
ओळ २१:
या काळात अ‍ॅनी बेझंटकडे कृष्णाजी आई म्हणून पाहू लागले होते. कृष्णाजींच्या वडिलांनी कृष्णाजींचे कायदेशीर पालकत्व बेझंटबाईंना दिले होते. कृष्णाजींना मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे त्यांचे वडील झाकोळले गेले. इ. स. १९१२ मध्ये कायदेशीर पालकत्व रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अ‍ॅनी बेझंटला कृष्णाजी व नित्याचा कायदेशीर "ताबा" मिळाला. कुटुंब व घरापासून दूर गेलेल्या कृष्णाजी व नित्यामधील संबंध यामुळे अधिक मजबूत झाले आणि नंतरच्या काळात या दोघांनी सोबतच प्रवास केला.
 
१९११ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीने आगामी विश्वगुरूच्या स्वागतास जगाला तयार करण्यासाठी ऑर्डर ऑफ द स्टार इन दी इस्ट (ओएसई) या संस्थेची स्थापना केली. कृष्णमूर्तींना मुख्याधिकारी बनविण्यात आले. विश्वगुरूच्या आगमनाच्या तत्त्वावर विश्वास ठेवणार्‍याठेवणाऱ्या कुणालाही सदस्यत्व उपलब्ध होते. लवकरच सोसायटीच्या आत आणि बाहेर हिंदू वर्तुळात, भारतीय प्रसारमाध्यमांत वादविवाद सुरू झाले.
 
मेरी ल्युटेंस या कृष्णाजींच्या मैत्रिणीच्या व चरित्रकर्तीच्या म्हणण्यानुसार आपल्याला विश्वगुरू बनायचे आहे यावर एके काळी कृष्णमूर्तींचा विश्वास होता. एप्रिल १९११ मध्ये कृष्णाजी व नित्या इंग्लंडला गेले. तिकडे कृष्णमूर्तींनी आपले पहिले सार्वजनिक भाषण दिले आणि लिखाणास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या आरंभापूर्वी या बंधूंनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या. युद्धसमाप्तीनंतरही कृष्णमूर्तींची भाषणे आणि लेखन सुरू राहिले. इ. स. १९२१ मध्ये ते हेलेन नॉद या सतरावर्षीय अमेरिकन युवतीच्या प्रेमात पडले; पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत.
 
==आयुष्य बदलविणारे अनुभव==
१९२२ मध्ये कृष्णा व नित्या कॅलिफोर्नियाहून सिडनीला गेले. कॅलिफोर्नियात असताना क्षयरोगी नित्यानंदाच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून ओहाय खोर्‍यातील एका कुटिरात ते राहत होते. ओहायमध्ये या बंधूंना रोझलिंड विल्यम्स या अमेरिकन युवतीची मदत मिळाली. ओहायमधील काळात प्रथमच जिद्दू बंधू थिऑसॉफिकल सोसायटीच्या सभासदांच्या निरीक्षणाखाली नव्हते. हे ठिकाण जिद्दूंना आवडले. अखेर त्यांच्या अनुयायांनी एक विश्वस्त संस्था स्थापन करून हे कुटिर व सभोवतालची जागा विकत घेतली. मग हे स्थान कृष्णमूर्तींचे अधिकृत निवासस्थान झाले.
 
==संदर्भ==