"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५५:
 
जून १९८१ मध्येच मा शीलाचे पती स्वामी प्रेम चिन्मय यांनी ऑरेगन राज्यात एक रँच (मुख्यत: कुरण म्हणून वापरले जाणारे विस्तीर्ण क्षेत्र) विकत घेतले. त्याचे "रँचो रजनीश" असे नामकरण झाले आणि ऑगस्ट अखेरीस ओशो तिथे निवासास आले. वर्षभरातच या जमिनीच्या वापरावरून कायदेशीर खटले सुरू झाले. स्थानिक रहिवाशांशीही या कम्यूनचे संबंध सलोख्याचे नव्हते. रजनीशपूरम या नावाने शहराला अधिकृत मान्यता मिळावी अशा रजनिशींचा मानसही प्रत्यक्षात आला नाही. या घडामोडींदरम्यान नोव्हेंबर १९८४ पर्यंत हे सार्वजनिक मौन टिकले. या काळात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या शिष्यांना ओशो कारमधून दर्शन देत. तब्बल ९३ रोल्स-रॉयस त्यांच्याकडे जमा झाल्या. सन १९८३ मध्ये ओशो फक्त आपल्याशीच बोलतील अशी घोषणा शीलाने केली. अनेक संन्याशांच्या मनात शीला ही ओशोंची अधिकृत प्रतिनिधी असण्याबद्दल संदेह निर्माण झाला. या काळात शीलाच्या नेतृत्वाचा निषेध म्हणून अनेक संन्याशांनी आश्रम सोडला.
[[चित्र:Osho Drive By.jpg|इवलेसे|उजवे|300px|१९८२ च्या सुमारास रजनीशपूरममध्ये एका दैनिक फेरीदरम्यान ओशोंचे स्वागत करणारे नवंसन्यासी ]]
 
नोव्हेंबर १९८१ मध्ये धर्मसेवक म्हणून आणि रजनीशवाद या धर्माचे प्रणेते म्हणून ओशोंनी रहिवासासाठी अर्ज दाखल केला. आजारी असणारा आणि मौन बाळगणारा माणूस धार्मिक नेता असू शकत नाही, असे कारण दाखवून हा अर्ज फेटाळण्यात आला. तीन वर्षांनंतर मात्र हा अर्ज स्वीकारण्यात आला आणि धार्मिक नेता म्हणून राहण्यास ओशोंना परवानगी देण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले