"अरेसीबो वेधशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Arecibo Observatory Aerial View.jpg|right|thumb|350px|अॅरेकिबो रेडियो टेलिस्कोप]]
'''अॅरेकिबो वेधशाळा''' ही [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरातील]] [[पोर्तो रिको]] देशामध्ये अॅरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा [[किलोमीटर]] अंतरावर असलेली एक [[वेधशाळा]] आहे. अॅरेकिबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो दूर्बिण<ref group="श">रेडियो दूर्बिण ({{lang-en|Radio Telescope}} - रेडियो टेलिस्कोप) - रेडियो लहरी पकडणारी दूर्बिण</ref> हे आहे. [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] संरक्षण खाते आणि [[कॉर्नेल विद्यापीठ|कॉर्नेल विद्यापीठाच्या]] संयुक्त प्रकल्पान्वये ही वेधशाळा [[१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९६३]] रोजी बांधून पूर्ण झाली. हिच्या उभारणीसाठी ८३ लक्ष डॉलर्स खर्च आला होता.
==अॅरेकिबो डिश अॅंटेना==
अॅरेकिबो वेधशाळेच्या परिसरातील अनेक टेकड्यांच्या मधल्या खोलगट भागाचा अंतर्गोल<ref group="श">अंतर्गोल किंवा अंतर्वक्र ({{lang-en|Concave}} - कॉन्केव्ह)</ref> आरशासारखा उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आरसा नसून विद्युतचुंबकीय<ref group="श">विद्युतचुंबकीय ({{lang-en|Electromagnetic}} - इलेक्ट्रोमॅग्नेटिक)</ref> संदेशांचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारी प्रचंड डिश अॅंटेना आहे. ही डिश निरनिराळ्या दिशांना फिरविता येत नाही किंवा तिचा कोनही बदलता येत नाही. अॅरेकिबो डिश अॅंटेन्याचा व्यास ३०४ मीटर असून त्याने ८ हेक्टर (२२० एकर) क्षेत्र व्यापलेले आहे. डिशच्या सभोवती परिघाजवळ ११७ मीटर, ७९ मीटर आणि ७९ मीटर उंचीच्या तीन मनोर्यामधून ६५ मीटर असलेला एक त्रिकोणी प्लॅटफॉर्म डिशच्या मधोमध तरंगत ठेवण्यात आला आहे. विद्युतचुंबकीय संदेश डिशवर परावर्तीत होऊन प्लॅटफॉर्मवरील एका विशिष्ट बिंदूत एकत्र होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने ते ग्रहण केले जातात.