"असंगत नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: is:Leikhús fáránleikans
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''असंगत नाट्य''' किंवा '''न-नाट्य''' म्हणजे इंग्रजीत ’द थिएटर ऑफ अ‍ॅबसर्ड्‌स’. हा नाटकांमधला एक विशिष्ट प्रकार आहे. या नाट्यप्रकाराला मराठीच्या संदर्भात व्यस्ततावादी रंगभूमी असे नाव, रा.ग.जाधव यांनी दिले आहे. विनाशाकडे चाललेल्या जगात माणसाच्या नियतीवर नियंत्रण ठेवू पाहण्याचा व्यर्थ प्रयत्‍न करणाऱ्या मानवतेचे व्यस्त दर्शन अशा नाटकांतून होते. जो माणूस आपल्या धार्मिक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक मुळापासून उखडलेला आहे अशी माणसाची कथा या असंगत नाटकातून सादर केली जाते. अशी नाटके लिहिणाऱ्या नाटककारांनी जगाचे जे वेगळे दर्शन घेतले, त्याची त्यांनी रंगमंचभाषा निर्माण केली आणि ते निरर्थ-निरालंब अनुभव नाटकरूपाने सादर केले.
 
असंगत नाट्यासाठी झालेला भाषेचा विचार, हा मुळातच माणसामाणसांमधील संवाद नाहीसा झाला असताना, वर वरचेवरवरचे औपचारिक संवाद चालू ठेवण्याच्या तिटकाऱ्यातून मिर्माण झालेला असतो. प्रेमातील कूट प्रश्न, मैत्रीचे मायाजाल, माणसाच्या विषण्णतेतून बाहेर पडणारे प्रेमकारण आणि माणसाच्या एकाकीपणाचे कवच न भेदू शकणारे प्रेम आणि मैत्री, अशा अनेक सूत्रांवर ही नाटके आधारलेली असतात. नाटकांतून जेथे संवाद साधत नाही, तेथे तो चालू ठेवण्याचा उठवळ यत्‍न म्हणजे लाकडी सामानाशी संवाद केल्यासारखे आहे, हे या नाटकांतून दर्शवले जाते.
 
==असंगत नाट्ये लिहिणारे पाश्चात्त्य नाटककार==