"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
अजून बदल करायचे आहेत...
ओळ २५:
}}
 
'''पनवेल''' हे [[भारत]] देशातील, [[महाराष्ट्र]] राज्यातील,[[रायगड]] जिल्ह्यातील, [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातील]] एक शहर व नगरपालीका आहे. '''{{PAGENAME}}'''ला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]] ला लागून आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग येथून सुरु होतो. पनवेल मुंबईपासून २१ कि.मी. अंतरावर आहे.
 
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हे जिल्ह्यातील ४ पैकी सर्वात मोठा (५६४ गावे) म्हणजेच पनवेल प्रांत व पनवेल तालुक्याचे ठिकाण आहे.
'''{{PAGENAME}}'''उत्तर अक्षांश १८.५८', पूर्व रेखांश ७३.१२' वर वसलेले आणि बौद्ध कालापासून सर्वश्रुत असलेले पनवेल शहर सुमारे ८००-८५० वर्षापासून कोकणप्रांतातील,शुर्पारक भागातील किंवा उत्तर कोकणातील एक प्रमुख शहर म्हणून गणले जाते.याचे कारण म्हणजे,या शहराला लाभलेली त्याची अशा भौगोलिक वैशिष्टयांविषयी माहिती देत आहोत.पनवेलच्या पुर्व दिशेस उंच पर्वतात उगम पावणारी 'गाढी नदी' ज्या ठिकणी अरबी समुद्रास मिळते त्याच ठिकाणी वसलेले गाव म्हणजेच 'पनवेल' होय. जेथे गाढी नदी अरबी समुद्राला मिळते,तेथे पनवेल बंदर विकसित झले आहे.भारताचा पश्चिम किनारा दंतुर असल्याने व पनवेल बंदर मोठ्या समुद्रापासून फ़ार आत असल्याने ते वादळांपासुन सुरक्षित असल्याने ह्या बंदराचा पुर्वी मोठ्या प्रमाणात विकास झाला.
 
==भूगोल==
'''{{PAGENAME}}'''फार काळापूर्वी आत्ताच्या पनवेलच्या परिसरात 'नाग' लोकांचे राज्य होते, त्या काळी पनवेलला 'पवनपल्ली' असे संबोधत असत. इतिहास कळात अनेक ठिकाणी पर्णवेला, पानवेला व पानवेल अशा अनेक नावांनी पनवेलला संबोधत असत. यादवांच्या काळात पनवेलला असलेल्या बंदरातून परदेशाशी व्यापार चालत असे. त्या वेळी देवगिरीच्या रामराजा यादवाचे अधिकारी ह्या गावाची काहीतरी नोंद करायला हवी म्हणून, 'पनवेल' हे समुद्राच्या काठावरचे व्यापार करणारे गाव म्हणून याला 'पण्यवेला' असे संबोधत असत. ह्या नावात दोन पदे आहेत, पहिले- 'पण्य' या शब्दाचा अर्थ 'विक्री करण्याचे' असा आहे. तर दुसरे पद- 'वेला' याचा अर्थ 'किनारा' किंवा 'ज्या वेळेला भरतीचे पाणी किनाऱ्याला लागते ती हद्द' असा आहे. थोडक्यात 'बंदर' असा आहे. काही काळातच ह्या गावाच नाव बदलून 'पनवेल' असे झाले.
पनवेल गाढी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते.
त्याच प्रमाणे 'पनवेल' हे नाव एका तांदळाच्या जातीचे सुद्धा आहे. एके काळी ह्या गावात तांदळाचा फार मोठा व्यापार चालात असे, म्हणून तांदळाच्या एका जातीला पनवेल हे नाव पडले.
 
==लोकजीवन==
२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३% तर महिला ४७% आहेत. शहरातील ७८% लोक साक्षर (पुरुष ८१%, महिला ७४%) असून १३% लोकसंख्या ६-वर्षाखालील वयोगटातील आहे.
पनवेल शहरावर पनवेल नगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन करते.
 
==इतिहास==
पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुनं आहे. या काळात मुघल, इंग्रज, पोतुगीझ व मराठ्यांनी विविध कालावधी साठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली व ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरु करण्यात आल्या. समुद्र व जामिनी व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले