"प्रफुल्ल केशवराव घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३५:
 
==साहित्य लेखन==
विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन या साहित्यप्रकाराला स्वतंत्र स्थान निर्माण करून देण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. घाणेकर हे जीवशास्त्राचे अभ्यासक आहेत. चार भिंतींच्या आड जीवशास्त्र शिकता येत नाही, या भावनेतून त्यांची भटकंती सुरू झाली. 'पर्यटन' या मासिकातून किल्ले, लेणींमधील झाडे, वनस्पती, फुले पाहता पाहता किल्ल्यांच्या अनघड वाटांवर लिहिण्याची सुरुवात झाली. शिवशाहीचा गौरवशाली इतिहास ज्या गडांवर घडला त्यातील अनेक किल्ले तोपर्यंत अनोळखी होते. घाणेकर यांनी या किल्ल्यांना प्रकाशात आणले. 'जो किल्ला पाहिला नाही, त्याबद्दल लिहायचे नाही,' हा त्यांचा दंडक आजही कायम आहे. त्या काळात किल्ल्यांवर लिहिणारे लेखक होते; पण ते लेखन इतिहासाच्या अंगाने जाणारे ललित होते. मात्र, घाणेकर यांची धाटणी वेगळी होती. किल्ल्यावर कसे आणि कधी जायचे, जाताना कोणती पथ्ये पाळायची, तेथे गेल्यावर पर्यावरणाची जपणूक कशी करायची, तेथील शिल्प याचीयांची माहिती ते त्यांच्या लेखनातून देऊ लागले. त्यामुळे त्यांचे लेखन अल्पावधीतच लोकांना आपलेसे वाटू लागले. 'साद सह्यादीची, १०० किल्ल्यांची' या त्यांच्या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. 'दुर्गविज्ञाना'सारखा विषय त्यांनी मराठीत आणला. 'भटकंती लेह लडाखची, अल्पपरिचित हिमालयाची' या पुस्तकातपुस्तकांत निसर्ग वाचताना माणसांचेही दर्शन त्यांनी घडविले. विज्ञानाच्या आवडीतून 'विज्ञानाचं नवलतीर्थ'चा जन्म झाला. कोणत्याही विषयाची शास्त्रीय माहिती, संशोधन, व्यवहारातील नावे आणि त्याची उपयुक्तता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.
 
ते आता प्राध्यापकी पेशातून आता निवृत्त झाले आहेत.
 
==आगामी लेखन==