"रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५०:
 
गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात आणि मराठी माणसांच्या जगभरातल्या कुटुंबात समर्थांनी रचलेल्या आरत्या गायिल्या जातात. श्रीरामांनी, श्री गणेशाने आणि अन्य देवतांनी भक्तावर प्रसन्न व्हावे, दुष्टांचा संहार करावा, सज्जनांचे रक्षण करावे, भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात, अशी प्रार्थना समर्थांनी या आरत्यांद्वारे केली आहे. त्यांच्या आरत्यांचा निनाद सर्व मंदिरात दररोज होतोच. सामान्यांतला सामान्य भाविकही या आरत्या करताना तल्लीन होतो. अत्यंत साधे सोपे पण, परमेश्वराला आर्ततेने साद घालणारे शब्द, प्रासादिक रचना यामुळेच समर्थांच्या आरत्या चिरंतन आणि समाजाला संजीवनी देणाऱ्या ठरल्या आहेत. गणेशोत्सवात श्री गणेशाची आरती समूहाने म्हणण्याची परंपरा सुरू झाली. आता गणेशोत्सवाच्या काळात ही आणि अन्य आरत्या हजारो भक्त एका तालासुरात म्हणतात तेव्हा, सारे वातावरणच श्री गणेशमय होऊन जाते. या आरत्या म्हणजे श्री समर्थ रामदासांनी मराठी भाषेला आणि माणसांना दिलेले वरदान आहे.
 
श्री समर्थ रामदास स्वामी कृत : - शंकराची आरती
 
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा|
विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा|
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा|
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा||1||
जयदेव जयदेव जय श्री शंकरा|
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा||
कर्पुगौर भोळा नयनीं विशाळा|
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा|
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा|
ऎसा शंकर शोभे उअमवेल्हाळा||2||
देवीं दैत्यीं सागर मंथन पैं केले|
त्यामाजी अवचित हलहल जे उठिले|
तें त्वां असुरपणें प्राशन केलें|
नीलकंठ नाम प्रसिध्द झालें||3||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी|
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी|
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी|
रघुकुळटिळक रामदासाअंतरी||4||