"कारंजा लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: bn, bpy, it, new, pt, vi |
No edit summary |
||
ओळ २०:
}}
''कारंजा लाड''' ( अक्षांश २०° २९′ उत्तर; रेखांश ७७° २९′ पूर्व) हे [महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वाशीम जिल्हा|वाशीम जिल्ह्यातील]] नगरपरिषद असलेले शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषीवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने कारंजा लाड, असा या गावाचा उल्लेख केला जातो.
'''लाड कारंजे''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वाशिम जिल्हा|वाशिम जिल्ह्यातील]] नगरपरिषद असलेले शहर आहे. हे शहर इ.स.च्या १३व्या शतकातील{{संदर्भ हवा}} हिंदू गुरू [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. ▼
'''कारंजा लाड गावातली जैन मंदिरे :'''
* चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर(पद्मावती देवीचे मंदिर)
*मूलसंघ चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर आणि,
*दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर
'''कारंजा गावातले जैनांचे आश्रम :'''
* संमतभद्र महाराज यांनी १९१८मध्ये स्थापन केलेला महावीर ब्रह्मचर्याश्रम
* संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४मध्ये स्थापन झालेला कंकूबाई श्राविकाश्रम
'''इतर संस्था व इमारती :'''
* कंकूबाई कन्या शाळा
* श्वेतांबर जैन मंदिर व जैन स्थानकवासीयांचे साधनास्थळ
* रामदास स्वामींच्या शिष्यांचे दोन मठ - रोकडाराम म्हणून ओळखला जाणारा बाळकरामांचा मठ आणि दुसरा प्रल्हाद महाराजांचा मठ
* ब्राह्मण सभेची वास्तू
* तुकाराम भगवान काण्णव यांनी १८७६ मध्ये बांधलेले श्रीराम मंदिर
* नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा आणि तेथले नृसिंह सरस्वतींचे पादुका-मंदिर
* यांशिवाय, बालाजी मंदिर, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, हरिहर मंदिर, बाराभाऊ राम मंदिर वगैरे
*
'''कारंजा गावाच्या आसपासच्या गावातली मंदिरे :'''
* सोमठाणा या गावी असलेले शंकराचे हेमाडपंथी मंदिर, भांबचे देवी मंदिर, धामणीखडीचे नृसिंह मंदिर वगैरे
==इतिहास==
वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत.
अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. आहे. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही येतो. आतापर्यंत किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला जातो. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणे देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढय़ान्पिढय़ा सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आजही कारंज्यात आहे. आज मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील
भुयारी वाटा मात्र अजून शिल्लक आहेत.
▲
== नॄसिंह सरस्वतींचे जन्मस्थान ==
शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हेच नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असले पाहिजे हे होय, हे प्रथम [[वासुदेवानंद सरस्वती|वासुदेवशास्त्री सरस्वतींनी]]
नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. आज
== संकीर्ण माहिती ==
या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव [[वसिष्ठ]] ऋषीचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषीशी निगडित आहे. कारंजे येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे.
==कापसाचा व्यापार==
१८८६ मध्ये गावात कारंजा बाजार समितीची स्थापना झाली. त्या समितीकडून नुसार विदर्भातील कापसाचा व्यापार सर्वप्रथम नियंत्रित केला गेला. त्यामुळे कापूस व धान्य बाजार यांच्या व्यापाराला वेग आला. १९०४ मध्ये मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे -[[शकुंतला रेल्वे]]- सुरू झाली आणि कापसाची व्यापारपेठ विस्तारली. मुंबईच्या मुलजी जेठा, डोसा, रामजी काण्णव सिकची, गोविंददास गोवर्धनदास, गोयेंका अश्या पेढ्या, अकबर ऑइल मिल, अकबानी ऑइल मिल, अश्या तेलगिरण्या व लक्ष्मी जिनिंग मिल अश्या जिनिंग फॅक्टऱ्या, कारंज्यात सुरू झाल्या. कापसाच्या गाठींची परदेशी निर्यात व्हायला लागली.
{{विस्तार}}
|