"पथनाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पथनाट्य''' किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी, रस्त्यावर चालणार्‍या गारुड्याच्या किंवा डोंबार्‍याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही; ते निर्हेतुक असूच शकत नाही. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणार्‍या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादांतून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्‍न असतो.
[[ज्योती म्हापसेकर]] यांनी अनेक पथनाट्ये लिहून सादर केली आहेत.त्यांतली गाजलेली काही ही:
 
दर वर्षी पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनाच्या निमित्ताने नाट्यसमर्पित ह्या संस्थेतर्फे अहमदनगरचे डॉ.रवींद्र चव्हाण हे राज्यपातळीवर पथनाट्य स्पर्धा घेतात. यापूर्वी भोपाळमध्ये १९८४ साली तिथल्या रंगमंडल या संस्थेने अखिल भारतीय पथनाट्य शिबिर भरवले होते. मुंबईची जागर ह्या संस्थेने अनेक पथनाट्ये सादर केली आहेत. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्या संस्थेने मुंबईच्या बोरीबंदरजवळ एक पथनाट्य सादर केले होते. पोलिसांनी हातात दंडुके घेऊन तो नाट्यप्रयोग बंद पाडायचा प्रयत्न केला. परंतु जमावाने पोलिसांना अडवले आणि'रिंगणाच्या आत पाऊल टाकाल तर खबरदार'असा दम दिला होता, आणि पोलिसांना माघार घेणे भाग पाडले होते.
* कथा रेशनच्या गोंधळाची
 
* बापरे बाप
महाराष्ट्राखेरीज बंगाल,मणिपूर व केरळ या राज्यांत पथनाट्य चळवळ जोमात आहे. ब्रूनो एकार्ड्‌ट, बॉब अर्न्सट्थल पीटर स्च्यूमन या तिघांनी १९६३मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्थापन केलेल्या ’ब्रेड अ‍ॅन्ड पपेट थिएटर'तर्फे जगभर पथनाट्ये होतात. व्हिएटनामच्या युद्धाविरुद्ध जनमानस तयार करण्यासाठी या संस्थेने अथेन्स, आयर्लन्ड, इटली, उत्तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बार्सिलोना आणि लॅटिन अमेरिकेत अनेक पथनाट्ये सादर केली होती.
* मुलगी झाली हो
 
* हुंडा नको गं बाई
==गाजलेली मराठी पथनाट्ये==
 
* कथा रेशनच्या गोंधळाची ([[ज्योती म्हापसेकर]])
* बापरे बाप ([[ज्योती म्हापसेकर]])
* मुलगी झाली हो ([[ज्योती म्हापसेकर]])
* शेंगदाणा (दीपक ढोणे)
* हुंडा नको गं बाई ([[ज्योती म्हापसेकर]])
"https://mr.wikipedia.org/wiki/पथनाट्य" पासून हुडकले