"तमाशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ?
ओळ ३:
==तमाशातील वाद्य==
तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली [[लावणी]]<nowiki/>गायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्त्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि [[तुणतुणे]]. [[भारूड]], [[गोंधळ]], [[पोवाडा]] (१३ व्या शतकात होऊन गेलेला [[शारंगदेव|शारंग देव]] याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात. [[मृदंग]], [[वीणा]], [[तंबोरा]], झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून [[सनई]], चौघडा, [[तुतारी]] हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, [[खंजिरी]], सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत.
 
*'''मराठवाड्यातील लोककला आणि लोकनाट्याची परंपरा:-'''*
मराठवाड्याला लोककला आणि लोकनाट्याची समृद्ध परंपरा आहे.कीर्तन, भजन, भारुड, वासुदेव, जागरण, गोंधळ, बहुरूपी, सोंगे इत्यादी लोककला प्रकार मराठवाड्यातील प्रमुख लोककला प्रकार आहेत. ग्रामीण नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना लोककला हा रंगभूमीचा फॉर्म अधिक जवळचा असल्याने लोकनाट्य अंगाने अनेक लेखकांनी नाटके लिहिली आहेत. प्रा.चंद्रकांत भालेराव यांनीही वगनाट्य लिहिली आहेत. इश्काच्या पायी बुडाले, हे त्यांचे एक उत्कृष्ट वगनाट्य .गणेश स्तवन करणारा गण न वापरता त्यांनी जनगणनायक अर्थात रसिकांनाच नमन केले आहे. चंद्रसूर्याचा वग अर्थात काळ्या दगडावरची रेघ ,नाक दाबलं तोंड उघडलं अर्थात झालं गेलं विसरून जा, असे तमाशाच्या वगाप्रमाणे दोन दोन नाव असलेली वगनाट्य प्रा.भालेराव यांनी लिहिली आहेत.लोककलेचा मानबिंदू असणारे थोर संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकरंगभूमीवर विपुल लेखन केले आहे. लोकनाट्य म्हणताच त्याचे नाव घेणे अपरिहार्य ठरते. ते म्हणजे हरहुन्नरी कलाकार लेखक शाहीर विश्वास साळुंखे . शाहीर साळुंखे यांनी भरपूर वगनाट्य लिहिली. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवर, भ्रष्टाचार कसा होतो, सामान्य माणसाची कशी लुबाडणूक होते हे दर्शवणारे अनेक प्रयोग केले. त्यांचे पैशाला अनेक वाटा, झगडा लोकनाट्य प्रचंड गाजली. राजकारण, समाजकारण अंधश्रद्धा असे अनेक विषय हाताळले. शाहीर साळुंके यांनी झगडा हे नाट्य दलित प्रश्नावर लिहून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. सगळ धाब्यावर बसवलं, खाली डोकं वर पाय, कॉलर ताठ बायका साठ अशी अनेक वगनाट्य शाहिरी विश्वास साळुंखे यांच्या नावावर आहेत. लोककलावंत, संशोधक, अष्टपैलू व्यक्तीमत्व डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे नाव लोकरंगभूमीवर कोरले गेले आहे ते त्यांनी सादर केलेल्या गाढवाचं लग्न, आंबेडकरी शाहिरीचे रंग, आणि रंगबाजी या कलाकृतींमुळे बेबंद नगरी हे डॉ. देवदत्त म्हात्रे यांचे एक राजकीय विडंबन असलेले लोकनाट्य होय. गाढवानं वाचली गीता हे सूर्यकांत सराफ यांचे प्रसिद्ध लोकनाट्य आहे. टेम्भुर्णी येथील मूळचे असणारे आणि सध्या मुबंई लोककला अकादमीचे प्रमुख असणारे लोककलेचे संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे लोककला सातासमुद्रापार पोचवत आहेत. गोंधळमहर्षी राजाराम कदम गोंधळी यांनी गोंधळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. भारुडरत्न निरंजन भाकरे, खंजिरीवादक भारूडकार मीरा उमाप लोकप्रबोधन करीत आहेत. शाहीरमहर्षी अंबादास तावरे, शाहीर सुरेश जाधव, शाहीर प्रवीण जाधव, शाहीर अरविंद घोगरे, शिवकर्तनकार डॉ. गजानन महाराज व्हावळ लोकप्रबोधन करीत आहेत. लोककलेचे अभ्यासक डॉ. राजू सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर उंडनगावकर, डॉ. गहिनीनाथ वळेकर, डॉ. शिवाजी वाघमारे, योगेश निकम चिकटगावकर, विकास एडके आदी मंडळी लोकरंगभूमीवर कार्यरत आहेत.
 
== गण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तमाशा" पासून हुडकले