"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
 
महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य मराठी भाषेत लिहिण्यासाठी १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली होती. विशेष कार्य अधिकारी म्हणून [[वसंत वामन मून]] यांची निवड केली. मून यांनी बाबासाहेबांच्या लेखनाचे, भाषणांचे देशविदेशातील संशोधन संकलित केले. त्यांच्या निधनापर्यंत १७ खंड प्रकाशित झाले. पुढील ५ खंड होतील एवढे साहित्य संपादित करून ठेवले होते. बाबासाहेबांचे विविध विषयांवरील समस्यांवर लेखन व भाषणांचे संकलन ग्रंथबद्ध करून खंडरूपात महाराष्ट्र शासनाकरवी प्रकाशित करून मून यांनी समोर आणले. विशेष असे की, बाबासाहेबांच्या इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यासंदर्भातील मंत्रिमंडळाचा निर्णय मून यांनी समितीवर असतानाच झाला होता. मात्र, मून यांचे निधन झाले. त्यानंतर आलेले सदस्य सचिव प्रा. हरी नरके, प्रा. दत्ता भगत, प्रा. अविनाश डोळस यांच्या कार्यकाळातही बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशन पूर्ण झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध विषयांवरील मूळ इंग्रजी साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केले. परंतु, (जानेवारी २०२१ पर्यंत) बाबासाहेबांच्या मूळ इंग्रजी साहित्य १ ते ६ खंडाच्या मराठी अनुवादाचा एकही ग्रंथ शासनाने प्रकाशित केला नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस सरकारने सुद्धा बाबासाहेबांच्या चरित्र साधने समितीमार्फत एकही खंड प्रकाशित केला नाही.
 
जुलै २०२१ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/all-english-volumes-babasaheb-will-be-translated-marathi-a313/|title=बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद|last=author/lokmat-news-network|date=2021-07-08|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-07-16}}</ref>
 
==प्रादेशिक भाषेतील खंड==