"डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना ही महाराष्ट्र शासनाची ए...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना''' ही [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाची]] एक योजना आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती]] प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने [[महावितरण|महावितरणद्वारे]] घरगुती वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१, अर्थात [[आंबेडकर जयंती|बाबासाहेबांची जयंती]] ते [[महापरिनिर्वाण दिन]] या कालावधीत वीजजोडणी कार्यक्रम राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल २०२१ रोजी या योजनेची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. [[नितीन राऊत]] यांनी दिली होती.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे जसे की, [[आधार (ओळखक्रमांक योजना)|आधार कार्ड]], रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना ५०० रुपये इतकी अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.