"नवयान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Janardanrd (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted 1 edit by Janardanrd (talk) (TwinkleGlobal) खूणपताका: उलटविले |
||
ओळ ३:
[[File:People paying tribute at the central statue of Bodhisattva Babasaheb Ambedkar in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, India.png|thumb|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]ामध्ये ‘नवयान’चे जनक बोधीसत्व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना अभिवादन करतांना जनता.]]
{{बौद्ध धर्म}}
'''नवयान''' किंवा '''नव-बौद्ध धर्म''' हा एक प्रमुख [[बौद्ध संप्रदाय]] असून [[भारत]]ातील बहुसंख्य बौद्ध धर्मीय याचे अनुयायी आहेत. ‘नवयान बौद्ध धर्माला’ ‘'''नवबौद्ध धर्म'''’ आणि नवयानी बौद्ध अनुयायांना ‘[[नवबौद्ध]]’ म्हटले जाते. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] या नवयान संप्रदायाचे जनक आहेत. नवयानचा अर्थ : नव — नवीन किंवा शुद्ध, यान — मार्ग किंवा वाहन. नवयानला '''भीमयान''' सुद्धा म्हटले जाते. नवयानी बौद्ध अनुयायांना [[नवबौद्ध]] असेसुद्धा म्हटले जाते, कारण ते सहा दशकांपूर्वी बौद्ध झाले होते. नवयानला भीमयान नाव हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या मूळ '''भीमराव''' नावावरून पडले. हा संप्रदाय [[महायान]], [[थेरवाद]] आणि [[वज्रयान]] पासून पूर्ण भिन्न आहे परंतु यात या तिन्हीं संप्रदायातील बुद्धांचे मूळ व शुद्ध सिद्धान्तंसोबत विज्ञाननिष्ठ व मानवतावादी सिद्धान्त घेण्यात आले आहेत. हा संप्रदाय कोणत्याही अंधश्रद्धा किंवा निरूपयोगी रूढी परंपरांना मानत नाही. या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची सुरुवात आणि स्थापना [[बोधिसत्त्व]] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. बाबासाहेबांनी पत्नी माईसाहेब समवेत [[अॉक्टोबर १४|१४ अॉक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथे महास्थविर चंद्रमणींकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली व नंतर आपल्या ५ लक्ष अनुयायांना नवयान [[बौद्ध धम्म]]ाची दिक्षा दिली आणि [[भारतात बौद्ध धर्म]]ाचे पुनरूत्थान केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्म स्वीकार करण्याच्या एक दिवस आधी एका पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही ज्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहात तो [[महायान]] बौद्ध धर्म असेल की [[हीनयान]] बौद्ध धर्म ?’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘माझा बौद्ध धर्म [[महायान]] ही नाही आणि [[हीनयान]] ही नाही. या दोन्ही संप्रदायात काही अंधश्रद्धायुक्त बाबी आहेत म्हणून माझा बौद्ध धर्म हा ''नवयान बौद्ध धर्म'' असेल. ज्यात बुद्धांचे मूळ सिद्धान्त आणि केवळ विवेकवादी सिद्धान्त असतील, कोणत्याही कुप्रथा किंवा अंधश्रद्धा नसतील. तो एक ‘शुद्ध स्वरूपाचा बौद्ध धर्म’ असेल’’ पत्रकाराने पुन्हा विचारले, “काय आम्ही याला 'भीमयान' म्हणू म्हणावे का?” “तुम्ही म्हणू शकता परंतु मी म्हणणार नाही, कारण मी स्वतःला [[गौतम बुद्ध]]ांच्या समान उभा करू शकत नाही.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरले. भारतीय बौद्ध किंवा नवयानी बौद्ध अनुयायी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्ध यांच्या समान सन्मान देतात. कारण बुद्ध आणि बाबासाहेब दोन्हीही भारतीय बौद्धांचे श्रेष्ठतम गुरु आहेत.
२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानूसार, भारतातील बौद्ध लोकसंख्यामध्ये ८७% नवयानी बौद्ध आहे. आणि जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE|title=दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम|last=मउदगिल|first=मनु|date=2017-06-23|work=IndiaSpend|access-date=2018-03-16|language=en-US}}</ref>
|