"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४:
== जनमत चाचणी ==
सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री१८ या नामांकित दूरचित्रवाहिन्यांच्या पुढाकारातून 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण केले गेले होते. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील २८ नामांकित व्यक्तींना परीक्षक म्हणून नेमण्यात आले. तीन टप्प्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.
;पहिल्या टप्प्यात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या (१९४८च्या नंतरच्या) भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील १०० महान भारतीयांची यादी केली गेली, या यादीत [[महात्मा गांधी]] यांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. ;दुसऱ्या टप्प्यात परीक्षकांनी या १०० नावांपैकी ५० नावे निवडली, तसेच इतरांशी स्पर्धा करता येऊ शकत नाही असे कारण देत परीक्षकांनी या १०० नावांमधून गांधींचे नाव वगळले आणि "भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४८) सर्वात महान भारतीय कोण?" आणि "गांधींनंतरचा सर्वात महान भारतीय कोण?" असा एकत्रित सवाल जनतेसमोर ठेवला. 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवण्यासाठी इतर थोर व्यक्तींसाठी लागू केलेले निकष गांधींसाठी लागू करण्यात आले नाहीत, आणि स्पर्धेविनाच त्यांना "पहिला सर्वश्रेष्ठ भारतीय" घोषित करण्यात आले. यावर अनेकांनी टीका केली. ;तिसऱ्या टप्प्यात — [[दूरध्वनी]], [[मोबाईल फोन]] व [[इंटरनेट]]द्वारे मत नोंदविण्यात आले. सर्वेक्षणासाठी एसी नेल्सन या कंपनीची मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरांतील नागरिकांची मते दोन टप्प्यांत जाणून घेतली. परीक्षक सदस्यांनीही आपापला पसंतीक्रम नोंदविला होता, ज्यात [[बाबासाहेब आंबेडकर]] व [[जवाहरलाल नेहरू]] यांना समान मते पडली होती. लोकांची मते, मार्केट रिसर्च आणि परीक्षकांची मते अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणांचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवून गेला. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर [[एपीजे अब्दुल कलाम]], [[वल्लभभाई पटेल]], [[जवाहरलाल नेहरू]], [[मदर तेरेसा]], [[जे.आर.डी. टाटा]], [[इंदिरा गांधी]], [[सचिन तेंडुलकर]], [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि [[लता मंगेशकर]] यांच्या नावांना पसंती मिळाली == पहिले १० सर्वात महान भारतीय ==
|