"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५५:
 
== बालपण व प्राथमिक शिक्षण ==
सूरज येंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. त्यांचे वडील मिलिंद येंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते राजा ढालेंचे जवळचे सहकारी असल्यामुळे सुरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर बामसेफ-बसपाचेही कार्यकर्ते झाले होते. 'वस्तुनिष्ठ विचार' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. त्यांच्या आग्रहामुळेच सुरजने कांशिराम यांचे 'चमचायुग' हे पुस्तक वाचले होते. त्यात आंबेडकरी चळवळीतील 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशिराम यांनी सांगितले आहेत. दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून [[शेतमजूर]], [[ट्रॅक्टर|ट्रकवरती]] हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. नांदेडच्या विधि महाविद्यालयात सरंजामी वातावरणातही ‘जीएस’ पदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ती जिंकलीही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/athour-mapia-news/dialogue-with-book-caste-matters-author-suraj-yengde-zws-70-1952091/|title=रॉकस्टार’ स्कॉलर!|date=2019-08-17|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> त्यानंतर काही दिवस [[मुंबई|मुंबईमध्ये]] शिक्षण घेऊन ते शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाले.<ref name="auto1"/> ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते संयुक्त राष्ट्रांच्या एका उपक्रमात काम करत आहेत.
 
== उच्च शिक्षण व संशोधन ==