"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८२:
 
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन [[भारत सरकार]]च्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा [[हिंदी]] अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.<ref>[http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाड्मय, २१ खंड पीएफ में]</ref> या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
==प्रकाशित झालेले लेख==
विविध वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके इत्यादींमधे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित झालेले काही लेख खालीलप्रमाणे आहेत.
 
#[[हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बॅंकिंग]] (१९४७)
#[[बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलीजन]] (१९५०)
#[[फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी]] (१९५१)
#[[बुद्धिझम अँड कम्यूनिझम]] (१९५६)
 
== पत्रकारिता ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला [[इ.स. १९२०]] मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. [[इ.स. १९१७]] साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ''“पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.”'' हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.