"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
== राजकीय कारकीर्द ==
== निधन ==
१५ मार्च २०२० रोजी धरमपेठ येथील निवासस्थानी फुलझेलेंचे निधन झाले. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलझेले यांचे सुपूत्र अशोक, आनंद आणि सुधीर हे तीन मुले आहेत.
 
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुलझेले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. "बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेले सदानंद फुलझेले हे त्या काळातल्या सगळ्या क्षणांचे साक्षीदार तर होतेच पण त्यांनी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला साथ दिली, त्यांच्यासमवेत उभे राहिले. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला", असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. "आज दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचे सोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रुपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील" अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ambedkarite-activist-sadanand-fulzele-dies-due-old-age/articleshow/74635436.cms</ref>