"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१९:४०, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

मार्शल विमलसूर्य चिमणकर हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[१]

चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[२]

निधन

वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[३]

लेखन

चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्यांकुर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा
  • साकेत कि अयोध्या?
  1. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  2. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  3. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms