"विमलकीर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३४:
}}
'''डॉ. विमलकीर्ती''' (जन्म: एल.जी. मेश्राम; [[फेब्रुवारी ५|५ फेब्रुवारी]] [[इ.स. १९४९|१९४९]] - [[डिसेंबर १४|१४ डिसेंबर]] [[इ.स. २०२०|२०२०]]) हे भारतीय [[बौद्ध तत्त्वज्ञान|बौद्ध विद्वान]], [[आंबेडकरवाद|आंबेडकरी]] विचारवंत, [[पाली भाषा|पाली]] भाषेचे व्यासंगी आणि [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील लेखक होते. [[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ|राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या]] पाली-पाकृत विभागाचे ते प्रमुख होते. ते उत्तम वक्ता सुद्धा होते. त्यांनी एकूण ८१ [[पुस्तक|पुस्तकांचे]] लेखन; तसेच अनुवाद केला. [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे त्यांचे प्रेरणास्रोत होते.<ref name="auto">{{Cite web|url=https://maharashtratimes.com/editorial/manasa/dr-vimalkirti-death/articleshow/79750656.cms|title=व्यासंगी: डॉ. विमलकीर्ती|website=Maharashtra Times}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/pali-literature-analyst-dr-vimalkirti-passed-away-385345|title=पाली साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. विमलकीर्ती यांचे निधन | eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref name="auto2">{{Cite web|url=http://www.samyakprakashan.in/author/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF|title=प्रो. डॉ. विमलकीर्ति | Samyak Prakashan|website=www.samyakprakashan.in}}</ref><ref name="auto3">{{Cite web|url=https://www.dalitdastak.com/well-known-buddhist-thinker-dr-vimalkirti-died/|title=ज्योतिबा फुले से हिन्दी जगत का परिचय कराने वाले बौद्ध विद्वान डॉ. विमलकीर्ति नहीं रहें|first=दलित दस्तक|last=न्यूज़|date=14 डिसें, 2020}}</ref><ref name="auto4">{{Cite web|url=http://newsonair.com/marathi/Marathi-Main-News.aspx?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8&id=20740|title=साहित्यीक डॉ. विमलकिर्ती यांचे कोविडमुळे नागपूर इथं निधन|website=newsonair.com}}</ref>
विमलकीर्ती हे मुळचे [[भंडारा जिल्हा|भंडारा]] जिल्ह्यातील [[देवरीदेव]] या गावातील होते, व त्यांचे मूळ नाव एल.जी. मेश्राम होते. शिक्षणासाठी ते [[नागपूर|नागपुरात]] आले. नागपुरातील पन्नासे ले-आउट (त्रिमूर्ती नगर) येथे राहात होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/>
बौद्ध [[भिक्खू]] [[भदंत आनंद कौसल्यायन|डॉ. भदंत आनंद कौशल्यायन]] यांच्या हस्ते १९७१ साली [[बौद्ध धर्म|बौद्ध धम्माची]] [[उपसंपदा]] घेतली. त्यानंतर त्यांना भन्ते आनंद कौसल्यायन यांनी विमलकीर्ती नाव दिले. नंतर ते डॉ. विमलकीर्ती नावाने ओळखले जाऊ लागले. १९७० पासून ते १९८८ पर्यंत अशी सुमारे दोन दशके ते कौसल्यायन यांच्या सहवासात होते. त्यातून त्यांना आंतरिक प्रेरणांच्या शोधाची आणि या शोधातून गवसले ते प्रसृत करण्याची प्रेरणा मिळाली. भदंत आनंद कौशल्यायन यांचे सर्व [[बौद्ध साहित्य]] प्रकाशित करण्याचे काम डॉ. विमलकीर्ती यांनी केले. आतापर्यंत [[पाली भाषा|पाली]], [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषेतील पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्याचे सर्वाधिक प्रकाशन [[दिल्ली]] येथील [[सम्यक प्रकाशन|सम्यक प्रकाशनतर्फे]] प्रकिशित करण्यात आले.<ref name="auto"/><ref name="auto1"/><ref name="auto2"/><ref name="auto3"/><ref name="auto4"/>
ते पाली साहित्याचे व्यासंगी विद्वान होते. [[गौतम बुद्ध|तथागत बुद्धांंच्या]] विचारांची मांडणी त्यांनी मराठी-हिंदीतील पुस्तकांद्वारे केली, यात '[[त्रिपिटक]]' सुद्धा होते. १९७९मध्ये 'स्वतंत्र मजूर पक्ष' हे त्यांचे पहिले पुस्तक आले होते, जे बाबासाहेबांनी इ.स. १९३६ साली स्थापन केलेल्या '[[स्वतंत्र मजूर पक्ष]]' या राजकीय पक्षावर आधारित होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/><ref name="auto2"/><ref name="auto3"/><ref name="auto4"/> यानंतर धर्मांतर: प्रेरणा आणि प्रयोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिकता, पाली सिक्खापक: पठमो भागो, बौद्ध धर्म के इतिहास में डॉ. आंबेडकर का योगदान, धर्मांतरण की आवश्यकता क्यो?, बौद्ध संस्कृती भारत, सतसार इशारा, वज्रसूची, देश के दुश्मन, हिंदू कोड बिल या पुस्तकांच्या लेखनासह मिलिंद प्रश्न, या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. याशिवाय ससाई: जापान से भारत, बौद्धमत, बुद्ध का दर्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर के पत्र, पाली व्याकरण, पाली त्रिपिटक, ललित विस्तर, दीघनिकाय, महावंस, चुलवंस, दीपवंस, बोधीचर्यावतार ही पुस्तके लिहिली. पालीविषयक पुस्तकांशिवाय महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खंडरूपात त्यांनी लिखाण केले.<ref name="auto"/><ref name="auto1"/><ref name="auto2"/><ref name="auto3"/><ref name="auto4"/> [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भाषणे आणि पत्रांचे मराठीतून हिंदीत भाषांतर करण्याचे काम त्यांनी केले. [[जोतीराव गोविंदराव फुले|महात्मा फुले]] यांच्या साहित्याचे मराठी ते हिंदी भाषांतरही त्यांनी केले आहे. त्यांचे लिखाण हे [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीला]] दिशादर्शन करणारे असल्याचे मानले जाते. बौद्ध धम्मग्रंथ असलेल्या त्रिपिटकाला उघडपणे मांडण्याचे काम डॉ. विमलकीर्ती यांनी केले. यासोबतच मोग्गलान पाली व्याकरण, पाली काव्यधारा, बौद्ध संस्कार जीवनपद्धती, श्रमण संस्कृती बनाम ब्राम्हणी संस्कृती, भगवान बुद्ध प्रेरणादायी जीवन, थेरीगाथा या पुस्तकाच्या लेखनासह धम्मपदाचा मराठी अनुवाद डॉ. विमलकिर्ती यांनी केला. सुमारे ८१ पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद त्यांनी केला.<ref name="auto"/><ref name="auto1"/><ref name="auto2"/><ref name="auto3"/><ref name="auto4"/>
त्यांचे १४ डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथे निधन झाले.<ref name="auto"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto4"/>
|