"रणजितसिंह डिसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

वैश्विक शिक्षक पुरस्कार विजेते २०२०
Content deleted Content added
नवीन पान: '''रणजितसिंह डिसले''' हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल...
(काही फरक नाही)

००:४७, ४ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

रणजितसिंह डिसले हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत ते शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. सात कोटी रक्कमेचा हा पुरस्कार आहे, आणि हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक असा बहुमान प्राप्त झाला आहे.