"विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' हे आंबडवे य...
(काही फरक नाही)

११:४०, २० नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबडवे या गावात उभारण्यात आलेले स्मारक आहे. आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. मंडणगडपासून १८ कि.मी. अंतरावर आंबडवे गावाला पाचरळ फाट्याहून रस्ता आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारमध्ये भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कार्य केले. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिले आहे. आंबडवे या त्यांच्या मूळ गावी या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. स्मारक परिसरांत व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.