"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र भारतीय संसद भवनाच्या केंद्... |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र भारतीय संसद भवनाच्या केंद्रीय कक्षात आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. चित्रकार झेबा अमरोहवी यांनी बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र दान केले होते. हे तैलचित्राचा ७'३'' x ४'३'' आकाराचे आहे.
आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख 14 एप्रिल 1991 होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तेव्हा हा बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव 14 एप्रिल 1990 ते 14 एप्रिल 1991 पर्यंत सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री रामविलास पासवान आणि पंतप्रधान व्ही.पी. सिंह होते. याच काळात भारत सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी अनुसूचित जातीच्या लोकांद्वारे (दलित) आणि त्यांच्या प्रतिनिधींद्वारे बऱ्याच काळापासून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर दुसरे एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत सरकार ते काम करत नव्हते. तथापि, जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतवरही जागा निर्माण झाली.
|