"चीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Deepakvatamkar123 (चर्चा)यांची आवृत्ती 1794199 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
संदर्भ दिला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४३:
}}
 
'''चीन''' ([[इंग्रजी]]: China/ चायना; [[नवी चिनी चित्रलिपी]]: 中国; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 中國; [[फीनयीन]]: Zhōngguó; उच्चार: चॉंऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- '''चीनचे जनतेचे प्रजासत्ताक''' ([[नवी चिनी चित्रलिपी]]: 中华人民共和国; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 中華人民共和國; [[फीनयीन]]: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: [[मिडिया:चीन देशनाव उच्चार.ogg|चॉंऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ]]) हा [[आशिया]]तला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. काही अहवालांनुसार, चीनमध्ये [[बौद्ध धर्म]] हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (किंवा १२२ कोटी) लोकसंख्या ही [[बौद्ध]] धर्मीय आहे.<ref>{{Cite web|url=https://buddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/|title=Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts|date=4 ऑक्टो, 2015}}</ref>
 
चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९६ लाख चौरस किलोमीटर आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला तिसरा किंवा चौथा सर्वात मोठा [[देश]] आहे. चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. [[उत्तर]] आणि उत्तरपुर्वेला मंगोलिया आणि मध्य आशियानजिक गोबी आणि तलमाकन वाळवंटे आहेत तर नैऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत. चीनचा पश्चिमेकडील भूभाग हा खडबडीत आणि उंचावलेला आहे. [[हिमालय]], काराकोरम, पामीर आणि थ्येन शान पर्वतरांगा याच भागात आहेत. [[तिबेट]]च्या पठारावरून निघणाऱ्या यांगत्से आणि पीत नदी या दोन पूर्ववाहिनी नद्या चीनमधील मोठ्या नद्या आहेत. चीन काळापासून [[भारत]] आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले होते [[सम्राट हर्षवर्धन]]ाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये चीननांशुक असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुकाला पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने चालत असे, त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हटले जात असे. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई जवळ असलेले नालासोपारा हे होते. भारतात आलेले फायान आणि यंगसांग हे बौद्ध भिक्खू ही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवीसनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्धभिखु चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथ त्यांचे चिनी भाषेत रूपांतर केले, त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म [[जपान]], [[कोरिया]], व्हिएतनाम या देशांमध्येही पोहोचला.
"https://mr.wikipedia.org/wiki/चीन" पासून हुडकले