"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
== वैशिष्ट्ये ==
औरंगाबादमधील नागरिकांसाठी व औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सिद्धार्थ उद्यान आणि या उद्यानाच्या परिसरात असलेले प्राणिसंग्रहाल एक आकर्षणाचा विषय व महत्त्वाचे प्रर्यटनस्थळ आहे. शहरातील सर्वांत मोठे उद्यान सिद्धार्थ गार्डन मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असल्याने शहरातील लोकांसह परगावाहून या उद्यानामध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येत असतात. उद्यानाच्या परिसरात मत्स्यालय देखील आहे, ज्यात विविध प्रजातींचे मासे आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय देखील उद्यानाच्या परिसरात आहे, त्यामध्ये मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व मुक्तिसंग्रामाचा इतिहास आहे. उद्यानात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळण्याची व्यवस्था आहे. सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दिवसाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या ८०० ते एक हजारांच्या घरात आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असते. सुटीच्या दिवशी यापेक्षा जास्त नागरिक उद्यानात येतात. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जास्त वाढ होत असते. सिद्धार्थ उद्यानासाठी मोठ्या व्यक्तींना २० रुपये तर, लहान मुलांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्राणिसंग्रहालयासाठी मोठ्या व्यक्तींना ५० रुपये तर, लहान मुलांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यानुसार, 'या उद्यानाचे २६ एप्रिल रोजीचे उत्पन्न १ लाख २७ हजार रुपये इतके होते, तर प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न ५४ हजार रुपये होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/daily-siddhartha-earns-up-to-two-lakhs/articleshow/69081481.cms</ref><ref>https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/auravgabad-siddharth-guarden-zoo-deserted-270959</ref><ref>https://m.lokmat.com/aurangabad/third-eye-siddhartha-garden-closed/</ref>
 
 
== बुद्ध मुर्ती ==
ध्यानस्त मुद्रेतील [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांचा]] ब्राँझ धातूचा पुतळा सिद्धार्थ उद्यानात बसवण्यात आलेला आहे. १९ ऑगस्ट २००२ रोजी बुद्धांचा पुतळा उद्यानात उभारण्याचा संबंधीचा ठराव औरंगाबाद महानगरपालिकेने मंजूर केला होता. या बुद्ध पुतळ्याची उंची १५ फुट उंच असून तो १० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर स्थित आहे. या पुतळ्याचे वजन ३.५० टन आहे.
 
== प्राणी संपदा ==