"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४६:
महाराष्ट्रातील बौद्ध लोक बुद्ध पौर्णिमा, भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा, वर्षावास, नामांतर दिन असे अनेक विशेष दिवस उत्सव म्हणून साजरे करतात.
=== बुद्धपौर्णिमा ===
{{मुख्य|बुद्ध जयंती}}
वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला, ह्याच पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ह्याच पौर्णिमेला त्यांचे महापरिनिर्वाण देखील झाले त्यामुळे बौद्ध संस्कृतीत बुद्धपौर्णिमेला महत्वाचे स्थान आहे.
=== धम्मचक्र प्रवर्तन दिन ===
{{मुख्य|धम्मचक्र प्रवर्तन दिन}}
14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 6,00,000 अनुयायांसोबत नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी लाखो बौद्ध दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात.
=== भीमजयंती ===
{{मुख्य|आंबेडकर जयंती}}
14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतातून नाहीसा झालेल्या बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले आणि बौद्धांचे ते आदरणीय ठरले. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते.
=== गुरुपौर्णिमा ===
{{मुख्य|गुरु पौर्णिमा}}
आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला होता शिवाय ह्याच पौर्णिमेला वाराणसी येथील सारनाथजवळील मृगदाय वनामध्ये पाच परिव्राजकांना बुद्धाने धम्मदीक्षा दिली. संबोधी प्राप्तीनंतरचे हे बुद्धाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय.
Line ६२ ⟶ ६९:
=== नामांतर दिन ===
नामांतर आंदोलन 1976 ते 1994 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित-बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले. त्यामुळे दरवर्षी 14 जानेवारी रोजी बौद्ध अनुयायांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामांतर दिन साजरा केला जातो.
=== महापरिनिर्वाण दिन ===
{{मुख्य|महापरिनिर्वाण दिन}}
महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात.
|