"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २९:
 
== इतिहास ==
बुद्धांच्या हयातीत इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला. [43 - 34]
 
बौद्ध धर्माचे संस्थापक, बुद्ध यांनी बोधगया येथे संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मउपदेश देणे सुरु केले. त्यांनी अनेक शिष्य लाभले, ज्यात भिक्खू-भिक्खुणी व उपासक - उपासिका यांचा समावेश होता. बुद्धांनी आपल्या शिष्यांना (भिक्खू) कल्याणप्रद अशा आपल्या सद्धम्माचा उपदेश करण्यासाठी चारही दिशांना संचार करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार हजारो भिक्खू भिक्खूणी धम्माचा उपदेश करण्यासाठी ह्या जंबुवदिपातील निरनिराळ्या ठिकाणी गेले. यामुळे महाराष्ट्रात देखील बुद्ध धम्माचा प्रचार प्रचार झाला. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रचार होण्याचे दुसरे एक कारण व्यापारीवर्ग होता. सुरुवातीपासून व्यापारीवर्ग तथागतांच्या धम्माकडे आतर्षित झाला होता. जून्या पाली वाङमयात त्यावेळी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांबद्दल बरीच माहिती मिळते. महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी अवन्ती-दक्षिणापथ हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. हा मार्ग उत्तरेकडे महाराष्ट्रातील पैठणपर्यंत व तेथून पुढे दक्षिणेकडे जात होता. धम्म प्रचारक भिक्खुंमुळे व व्यापारी वर्गामुळ् बुद्ध हयात असतानाच बुद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. [३४]
 
 
महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते. पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता.