"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{निर्माणाधीन}}
'''सदानंद फुलझेले''' (जन्म: १ नोव्हेंबर १९२८) हे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते, नागपूरचे उपमहापौर [[दीक्षाभूमी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे]] सचिव होते. नागपूर येथील बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजक होते.
 
सदानंद फुलझेले यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२८ रोजी नागपुरातील धरमपेठ भागात झाला. त्यांना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू त्यांच्या कुटुंबातूच मिळाले. १९४२ साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आले होते, त्यावेळी फुलझेले यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना पाहिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी समता सैनिक दल व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. १९५२ साली त्यांनी धरमपेठच्या डॉ. आंबेडकर नगरातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर १९५६ साली त्यांची नागपूरच्या उपमहापौरपदी निवड झाली. दरम्यान, त्यांची दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर १४ ऑक्‍टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या भूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी फुलझेले यांनी सांभाळली होती. त्यानंतर दीक्षाभूमीच्या निर्माणकार्यात फुलझेले यांची महत्त्वाची भूमिका होती. १९६३ साली त्यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड झाली. तेव्हापासून निधनापर्यंत ते या पदावर कार्यरत होते.