"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६५:
 
'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचा लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या सहकार्यामुळे २८ नोव्हेंबर १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरांनी जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. बॅरिस्टर आंबेडकरांनी माढा तालुका न्यायालयात व सोलापूर जिल्हा न्यायालयात खटले लढलेले आहेत. स्वातंत्रसेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यांच्याविरूद्ध खटला दाखल केला. शंकरराव मोरे, शंकरराव जेधे व बॅरिस्टर आंबेडकर यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य असतानाही त्यांनी आपले वकीलपत्र आंबेडकरांना दिले. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी बॅ. आंबेडकरांनी अण्णासाहेब भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांच्या उलटतपास अपूर्ण राहिला व त्यांनी पुढील तारीख घेतली. त्यानंतर त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. बॅ. आंबेडकर यांची कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे. पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला.<ref>http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/babasaheb-ambedkar-113120600010_1.html</ref>
 
== जातीअंताचा लढा व अस्पृश्यता निर्मूलन ==