"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४:
 
बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेले सदानंद फुलझेले हे त्या काळातल्या सगळ्या क्षणांचे साक्षीदार तर होतेच पण त्यांनी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला साथ दिली, त्यांच्यासमवेत उभे राहिले. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. आज दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचे सोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रुपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या. https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ambedkarite-activist-sadanand-fulzele-dies-due-old-age/articleshow/74635436.cms
 
सदानंद फुलझेले यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1928 रोजी नागपुरातील धरमपेठ भागात झाला. त्याना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू कुटुंबातूच मिळाले. 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आले होते, त्यावेळी फुलझेले यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना पाहिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी समता सैनिक दल व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.
 
1952 साली त्यांनी धरमपेठच्या डॉ. आंबेडकर नगरातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर 1956 साली त्यांची नागपूरच्या उपमहापौरपदी निवड झाली. दरम्यान, त्यांची दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर 14 ऑक्‍टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या भूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी फुलझेले यांनी सांभाळली होती. त्यानंतर दीक्षाभूमीच्या निर्माणकार्यात फुलझेले यांची मोलाची भूमिका होती. 1963 साली त्यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड झाली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते.