"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
 
जगाच्या इतिहासातील एकमेव रक्तविहीन क्रांती म्हणून ज्या घटनेचा उल्लेख केला जातो, ती घटना म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ लाख समाजबांधवांसोबत नागपुरात घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा होय. सम्यक क्रांतीचा हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक हात अविरत काम करत होते. यात अग्रभागी होते नागपूर शहराचे तत्कालीन उपमहापौर सदानंद फुलझेले. या बौद्ध धम्म क्रांतीपासून आजवरच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले फुलझेले १६ मार्च रोजी निवर्तले. सदानंद फुलझेले हे जणू नागपुरातील आंबेडकरी चळवळीचे दुसरे नाव होते. त्यांचा नि बाबासाहेबांचा संबंध १९४२ मध्ये आला. तो चळवळीचा मंतरलेला काळ होता. शेडय़ुल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना झाली होती. या संघटनेचे अधिवेशन नागपूरला झाले, तेव्हा डॉ. आंबेडकर यांना जवळून पाहण्याची संधी फुलझेले यांना मिळाली. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२८चा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समता सैनिक दल व शेडय़ुल कास्ट फेडरेशन तसेच सामाजिक चळवळीत व राजकीय क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. १९५२ मध्ये रामदासपेठ वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. १९५६ मध्ये उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेवेळी सदानंद फुलझेले पदाधिकारी होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर बाबासाहेबांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच रिपब्लिकन पक्षात प्रदेश अध्यक्ष आणि त्यानंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. १९६३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सचिवपदी त्यांची निवड झाली. तहहयात त्यांनी दीक्षाभूमीसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढच्या पिढीला सोपवायचा असेल तर शोषित, वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडायला हवी, हे ते चांगले जाणून होते. यातून पुढे त्यांनी दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. फुलझेले यांनी श्रीलंका, टोकियो, बुडापेस्ट हंगेरी, रशिया, बँकॉक, सिंगापूर, द. कोरिया, नेपाळ, अमेरिका, व्हिएतनाम, कंबोडिया, आदी देशांना भेटी देत आंबेडकरी विचारांचा आवाज बुलंद केला. विदर्भ विकास महामंडळावर संचालक म्हणून पाच वर्षे कार्य केले. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट परिषदेवर ते नामनियुक्त सदस्य होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, सारथी संस्थेचा विदर्भरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्याने शोषित, वंचितांच्या चळवळीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/sadanand-fulzele-vyaktivedh-dd70-2114234/
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा अॅड. आनंद, डॉ. सुधीर आणि सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत असल्याने सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
सदानंद फुलझेले हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज सकाळी ९.३० वाजता धरमपेठ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फुलझेले यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. फुलझेले नागपूरचे उपमहापौर होते. तसेच रामदासपढ वॉर्डाचे नगरसेवकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे ते आयोजक होते. तसचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते सचिव होते.
 
बाबासाहेबांच्या सच्चा अनुयायास मुकलो: मुख्यमंत्री
 
फुलझेले यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
 
बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेले सदानंद फुलझेले हे त्या काळातल्या सगळ्या क्षणांचे साक्षीदार तर होतेच पण त्यांनी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला साथ दिली, त्यांच्यासमवेत उभे राहिले. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. आज दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचे सोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रुपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या.