"रिडल्स इन हिंदुइझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
 
== पुस्तक प्रकाशनावरुन वाद ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथाने १९८७-८८ च्या दरम्यान वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन लोकप्रिय आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे 'हिंदूधर्मातील ती कोडी' म्हणजे फार संवेदनशील विषय बनला होता. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना व अन्य संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने झाली होती. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. [[मा.गो. वैद्य]] व [[दुर्गाबाई भागवत]] यांनी ग्रंथावर बंदी घालण्याचे समर्थन केले. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येथे झालेल्या रिडल्स समर्थन परिषद झाली, ज्यात दादासाहेब गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ, रूपा कुळकर्णी-बोधी व अनेक रिपब्लिकन नेते आलेले होते.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/turning-point/articleshow/34259857.cms</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/amp/news/EDT-bhimrao-bansod-article-about-rss-and-dr-5134053-NOR.html</ref> 'रिडल्स इन हिंदुइझम'वर बंदी घालण्याची मागणी झाल्यानंतर प्रतिकारार्थ आंबेडकरी तरुण रस्त्यावर उतरले. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा आंबेडकरी विचारवंतांनी वैचारिक परामर्ष घेतला. त्या ऐतिहासिक लढ्याचे वैचारिक नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. त्यांच्या तर्कवादी भूमिकेमुळे फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी पुढची पिढी तयार झाली.<ref>https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-founder-of-dalit-panther-raja-dhale-passed-away-abn-97-1932287/</ref>
 
त्यानंतर मात्र सर्व रिपब्लिकन नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/</ref>