"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ ६५५:
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक-मुंबईतील बीआयटी चाळ – मुंबईतील परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला २२ वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांचे हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने केली आहे.<ref>https://marathi.abplive.com/news/jitendra-awhad-on-dr-babasaheb-ambedkar-statue-in-bit-chawl-mumbai-733345</ref><ref>https://www.loksatta.com/mumbai-news/bharatratna-dr-babasaheb-ambedkar-residence-mumbai-to-be-developed-as-a-national-monument-jud-87-2030086/lite/</ref>
* आंबेडकरांनी शिक्षण संस्था निर्माण करण्याचा हेतूने पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात स्वखर्चाने ८७ एकर जागा खरेदी केली होती. तेथे सन १९४७ साली बंगला उभारला. सध्या ही वास्तू एक पर्यटक केंद्र बनली असून त्यास 'बाबासाहेबांचा बंगला' म्हणून ओळखले जाते.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/ambedkars-inspiring-bungalow-at-talegaon-dabhade-1662101/</ref>
== लोकप्रिय संस्कृतीमध्ये ==
आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपट, नाटके, पुस्तके, गीते-[[भीमगीते]] आणि इतर अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial-abn-97-2031123/</ref> इसवी सन २००० मध्ये [[जब्बार पटेल]] यांनी इंग्रजी भाषेत ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता [[मामुट्टी]] हे मुख्य भूमिकेत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehindubusinessline.com/blink/cover/b-r-ambedkar-resurgence-of-an-icon/article8447300.ece|title=Resurgence of an icon Babasaheb Ambedkar}}</ref> हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता.<ref>{{स्रोत बातमी | last =Viswanathan | first =S | title =Ambedkar film: better late than never | newspaper =The Hindu | date =24 May 2010 |url=http://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/article435886.ece | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20110910142933/http://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/article435886.ece | archivedate =10 September 2011 | df =dmy-all}}</ref> [[श्याम बेनेगल]] यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका ''संविधान'' मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.imdb.com/title/tt3562784/?ref_=fn_al_tt_1|title=Samvidhaan: The Making of the Constitution of India (TV Mini-Series 2014)|author=Ramnara|date=5 March 2014|work=IMDb|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20150527221343/http://www.imdb.com/title/tt3562784/?ref_=fn_al_tt_1|archivedate=27 May 2015|df=dmy-all}}</ref> अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या ''आंबेडकर आणि गांधी'' नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.<ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/fr/2009/07/17/stories/2009071750610300.htm |title=A spirited adventure |first=P. |last=Anima |work=The Hindu |date=17 July 2009 |accessdate=14 August 2009 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20110102102157/http://www.hindu.com/fr/2009/07/17/stories/2009071750610300.htm |archivedate=2 January 2011 |df=dmy-all}}</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत. आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात. विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष चर्चा असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो. [[दीक्षाभूमी]] आणि [[चैत्यभूमी]]वर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.<ref>[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref> आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf|शीर्षक=|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=१२३}}</ref>
आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.<ref name=":1" /><ref>[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref> बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.<ref>[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref> [[महाराष्ट्र]] शासनाने प्रकाशित केलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.<ref>[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref> [[तैवान]] देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.<ref>[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref><ref>http://www.budaedu.org/ebooks/6-EN.php</ref><ref>http://www.budaedu.org/en/</ref>
''भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी'' (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://edition.cnn.com/2011/WORLD/europe/05/19/graphic.novels/index.html |title=The top five political comic books |last1=Calvi |first1=Nuala |date=23 May 2011 |publisher=CNN |accessdate=14 April 2013 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20130109004845/http://edition.cnn.com/2011/WORLD/europe/05/19/graphic.novels/index.html |archivedate=9 January 2013 |df=dmy-all}}</ref>
[[चित्र:Buddhist flag of Indian Buddhists.jpg|thumb|200px|right|[[भीम ध्वज]]]]
आंबेडकरांचा [[अशोकचक्र|अशोकचक्रांकित]] [[भीम ध्वज]] हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43756471</ref><ref>https://m.lokmat.com/yavatmal/jai-bhim-carrot-thunderstruck/amp/</ref> या ध्वजाचा रंग [[निळा]] असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर '[[जय भीम]]' शब्द लिहिलेले असतात.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43756471</ref> [[नवयान]] ही नवीन बौद्ध धर्माची संकल्पना आंबेडकरांनी तयार केली होती.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43756471</ref>
आंबेडकरांचा जन्मदिन ([[आंबेडकर जयंती]]) एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] साजरी होते. आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी [[पुणे|पुण्यात]] साजरी केली होते.<ref>एप्रिल २०१८ चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/how-birth-anniversary-started-of-babasaheb-ambedkar-1660712/|शीर्षक=बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?|date=2018-04-14|work=Loksatta|access-date=2020-01-12|language=mr-IN}}</ref> [[महाराष्ट्र]]ात आंबेडकर जन्मदिन "[[ज्ञान दिवस]]" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2020-01-20}}</ref> अमेरिकेतील [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.<ref>{{Cite web|url=https://www.firstpost.com/world/ambedkar-jayanti-celebrated-for-the-first-time-outside-india-as-un-organises-special-event-2730772.html|title=Ambedkar Jayanti celebrated for the first time outside India as UN organises special event - Firstpost|website=firstpost.com|access-date=2018-11-09}}</ref><ref>{{Cite web|url=http://velivada.com/2017/04/29/dr-ambedkar-jayanti-celebrated-at-united-nations/|date=2017-04-29|title=Dr Ambedkar Jayanti celebrated at United Nations|website=velivada.com|access-date=2018-11-09}}</ref><ref>{{Cite news|url=http://www.newindianexpress.com/world/2018/apr/14/un-celebrates-ambedkars-legacy-fighting-inequality-inspiring-inclusion-1801468.html|title=UN celebrates Ambedkar's legacy 'fighting inequality, inspiring inclusion'|work=The New Indian Express|access-date=2018-11-09}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.newsstate.com/world-news/babasaheb-ambedkar-jayanti-celebrated-in-united-nations-article-52584.html|title=संयुक्त राष्ट्र में मनाई गई डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती - News State|work=newsstate.com|access-date=2018-11-09|language=en}}</ref>
==संदर्भ==
|