"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६३१:
 
आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते. तेव्हा भारताच्या ३५० कोटी रूपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत, हा परराष्ट्रनितीचा परिणाम होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मिरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकर असा वितार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करुन तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६३|language=मराठी}}</ref>
 
== स्मारके आणि संग्रहालये ==
जगभरात आंबेडकरांची विविध प्रकारची स्मारके व संग्रहालये निर्माण करण्यात आलेली आहे. अनेक स्मारके ऐतिहासिक दृष्टीने प्रत्यक्ष आंबेडकरांशी संबंधित आहेत, तसेच अनेक संग्रहालयांत त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींचा संग्रह आहे.
 
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय 'शांतिवन' — चिचोली गाव ([[नागपुर जिल्हा]]); यात आंबेडकरांच्या अनेक वैयक्तिक वस्तु ठेवण्यात आलेल्या आहेत.
* डॉ. आंबेडकर मणिमंडपम - [[चेन्नई]]
* [[आंबेडकर मेमोरियल पार्क]] - [[लखनऊ]], [[उत्तर प्रदेश]]
* [[भीम जन्मभूमी]] - [[डॉ. आंबेडकर नगर]] (महू), मध्य प्रदेश; आंबेडकरांचे जन्मस्थल
* [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] - २६ अलीपुर रोड, [[नवी दिल्ली]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन]] - महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील बनलेल्या सरकारी वास्तु
* डॉ. बी.आर. आंबेडकर मेमोरियल पार्क (डॉ. बी. आर. आंबेडकर स्मृती वनम) — अमरावती, आंध्र प्रदेश; येथे आंबेडकरांची १२५ फुट उंट पुतळा बनवण्यात येणार आहे.
* [[समतेचा पुतळा|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक]] ([[समतेचा पुतळा]]) - मुंबई, महाराष्ट्र; येथे आंबेडकरांची ४५० फुट उंच पुतळा बनवण्यात येत आहे.
* [[चैत्यभूमी]] - मुंबई, महाराष्ट्र; आंबेडकरांचे समाधी स्थळ
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा]] - [[कोयासन विद्यापीठ]], [[जपान]]
* [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] - [[लंडन]], युनायटेड किंग्डम; शैक्षणिक काळात (१९२१-२२) येथे आंबेडकर राहिले होते
* [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र]] - दिल्ली
* [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली, मुंबई)]] महाराष्ट्र
* [[राजगृह]] - दादर, मुंबई, महाराष्ट्र; आंबेडकरांचा बंगला व स्मारक
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय और स्मारक - [[पुणे]], महाराष्ट्र; राष्ट्रीय संग्रहालय
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक - महाड, महाराष्ट्र; येथे आंबेडकर ने [[महाड सत्याग्रह|सत्याग्रह]] केला होता
* [[मुक्तिभूमी|भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक]] - [[येवला]], नाशिक जिल्हा, महाराष्ट्र; येथे आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती
* [[दीक्षाभूमी]] — [[नागपूर]], महाराष्ट्र; येथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक-मुंबईतील बीआयटी चाळ – मुंबईतील परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला २२ वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांचे हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने केली आहे.<ref>https://marathi.abplive.com/news/jitendra-awhad-on-dr-babasaheb-ambedkar-statue-in-bit-chawl-mumbai-733345</ref><ref>https://www.loksatta.com/mumbai-news/bharatratna-dr-babasaheb-ambedkar-residence-mumbai-to-be-developed-as-a-national-monument-jud-87-2030086/lite/</ref>
* आंबेडकरांनी शिक्षण संस्था निर्माण करण्याचा हेतूने पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात स्वखर्चाने ८७ एकर जागा खरेदी केली होती. तेथे सन १९४७ साली बंगला उभारला. सध्या ही वास्तू एक पर्यटक केंद्र बनली असून त्यास 'बाबासाहेबांचा बंगला' म्हणून ओळखले जाते.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/ambedkars-inspiring-bungalow-at-talegaon-dabhade-1662101/</ref>
 
==संदर्भ==