"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५१२:
 
आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण|संकेतस्थळ=News18 Lokmat|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2020-01-20|language=hi}}</ref>
 
== वैयक्तिक जीवन ==
=== कुटुंब ===
{{मुख्य|आंबेडकर कुटुंब}}
[[File:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|right|300px|इ.स. १९३४ मध्ये मुंबईतील [[राजगृह]] येथील [[आंबेडकर कुटुंब]]ीय. चित्रात डावीकडून – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] (मुलगा), बाबासाहेब, [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] (पत्नी), लक्ष्मीबाई (वहिणी; आनंदरावांची पत्नी), मुकंदराव (पुतण्या) व खाली बसलेला कुत्रा टॉब्बी.]]
आंबेडकर आपली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईंना]] प्रेमाने "रामू" म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहित असे व त्यांची आलेली पत्रे वाचत असे.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=८०|language=मराठी}}</ref> रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. केवळ मुलगा [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज म्हणून जगला.<ref>{{Cite book|title=दलित समाजाचे पितामह डॉ. भीमराव आंबेडकर|last=जोगी|first=डॉ. सुनिल|publisher=डायमंड बुक्स|year=२००७|isbn=|location=|pages=५०|language=मराठी}}</ref>
 
[[चित्र:Dr. B.R. Ambedkar with wife Dr. Savita Ambedkar in 1948.jpg|thumb|right|इ.स. १९४८ मध्ये दिल्ली येथे द्वितीय पत्नी [[डॉ. सविता आंबेडकर]] सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे निधन झाले होते.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/tyagmurti-ramabai/amp_articleshow/69513517.cms</ref><ref>https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/video/aaj-ka-itihas-today-is-ramabai-ambedkar-death-anniversary/531810</ref> १९४० च्या दशकात [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचा]] मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इंसुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.<ref>{{Cite news|url=https://www.womensweb.in/2018/05/savita-ambedkar-discredited-caste-woman-may18wk3/|title=The Woman Behind Dr. Ambedkar - Why Are Our Women Denied Their Rightful Place In History?|date=22 May 2018|work=Women's Web: For Women Who Do|access-date=13 November 2018|language=en-US}}</ref> यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर ह्या पुण्याच्या [[सारस्वत]] [[ब्राह्मण]] कुटुंबातील व्यक्ती होत्या.<ref>{{Cite book|title=Maaisahebanche Agnidivya|last=Sukhadeve|first=P. V.|publisher=Kaushaly Prakashan|year=|isbn=|location=|pages=15|language=Marathi}}</ref> डॉ. कबीर यांच्याकडे डॉ. आंबेडकरांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय ज्ञान होते. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल १९४८ रोजी [[नवी दिल्ली]] येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी बाबासाहेबांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.<ref>{{cite book |last=Keer |first=Dhananjay |title=Dr. Ambedkar: life and mission |year=2005 |origyear=1954 |publisher=Popular Prakashan |location=Mumbai |pages=403–404 |isbn=81-7154-237-9 |url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA394 |accessdate=13 June 2012}}</ref> विवाहानंतर शारदा कबीरांनी '[[सविता आंबेडकर|सविता]]' हे नाव स्वीकारले आणि आयुष्यभर पतीची काळजी घेतली. लग्नानंतरही पूर्वीच्या शादरावरुन बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रेमाने ''शारू'' नावानेच हाक मारत असत.<ref>{{cite web | last=Pritchett | first=Frances |url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1940s.html | title=In the 1940s | accessdate=13 June 2012 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20120623190913/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1940s.html | archivedate=23 June 2012 | df=dmy-all }}</ref> सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' (अर्थ: [[आई]]) म्हणत असे. मुंबईमध्ये २९ मे २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web |url=http://www.rediff.com/news/2003/may/29mai.htm |title=Archived copy |accessdate=20 जून 2017 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20161210075024/http://www.rediff.com/news/2003/may/29mai.htm |archivedate=10 December 2016 |df=dmy-all }}</ref><ref>{{Cite web|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html|title=00_pref_unpub|last=Pritchett|first=Frances|website=Columbia.edu|access-date=11 January 2020}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.loksatta.com/lekha-news/the-buddha-and-his-dhamma-dr-b-r-ambedkar-1594868/|title=उपोद्घाताची कथा..|date=3 December 2017|work=Loksatta|access-date=11 January 2020|language=mr-IN}}</ref><ref>{{Cite news|url=https://m.timesofindia.com/india/PM-expresses-grief-over-death-of-Savita-Ambedkar/amp_articleshow/47857884.cms|title=PM expresses grief over death of Savita Ambedkar - Times of India|work=The Times of India|access-date=11 January 2020|language=en}}</ref><ref>{{Cite news|url=https://m.timesofindia.com/city/mumbai/B-R-Ambedkars-widow-passes-away/amp_articleshow/47838403.cms|title=B R Ambedkar's widow passes away - Times of India|work=The Times of India|access-date=11 January 2020|language=en}}</ref>
 
यशवंत आंबेडकरांचा विवाह [[मीरा आंबेडकर|मीरा]] यांचेशी झाला असून त्यांना एकूण चार अपत्ये झाली, त्यांचा क्रम पुढील प्रमाणे : [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] (बाळासाहेब), रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आंनदराज]]. यशवंतरावांचे निधन झालेले असून मीरा व त्यांची चारही अपत्ये सध्या हयात आहेत. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना [[सुजात आंबेडकर|सुजात]] हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक [[आनंद तेलतुंबडे|आनंद तेलतुबंडे]] यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतण्या आनंदराव यांचे नातू [[राजरत्न आंबेडकर|राजरत्न]] आहेत. आंबेडकर कटुंबातील हे सर्व सदस्य वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत आहेत, मात्र राजकारण-समाजकारण व [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरवादी चळवळीशी]], तसेच बौद्ध चळवळीशी सर्वजन कमी अधिक प्रमाणात जोडलेले आहेत.
 
=== भाषाज्ञान ===
[[File:Dr. Babasaheb Ambedkar written a letter to the Bonn University in fluent German language.jpg|thumb|300px|right|२५ फेब्रुवारी १९२१ रोजी जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आंबेडकरांनी तिथल्या प्रशासनास अस्खलित जर्मन भाषेत लिहिलेले पत्र.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/dr-babasaheb-ambedkar-autobiography-marathi-articles-1452080/lite/</ref>]]
 
आंबेडकर हे [[बहुभाषी]] होते. ते [[मराठी भाषा|मराठी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[फारसी|फारसी भाषा]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[कन्नड भाषा|कन्नड]] अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा जाणणारे विद्वान होते. तसेच यापैकी अनेक [[भाषा|भाषांवर]] प्रभुत्व होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१, ८१, ८८, ८९, ९०|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=२०, २३, १४४, १४९, १५०|language=मराठी}}</ref> जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/dr-babasaheb-ambedkar-autobiography-marathi-articles-1452080/lite/</ref>
 
==संदर्भ==