"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४९८:
१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी [[महाराष्ट्र]]ात फक्त २४८७, [[पंजाब]]ात १५५०, [[उत्तर प्रदेश]]ात ३२२१, [[मध्य प्रदेश]]ात २९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१५०|language=मराठी}}</ref><ref>भारतीय जनगणना,
१९५१ व १९६१</ref><ref name=":0" /> ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.<ref name=":2" /><ref>[https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false]</ref>
 
== महापरिनिर्वाण ==
{{मुख्य|चैत्यभूमी|महापरिनिर्वाण दिन|डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक}}
[[चित्र:Maha Parinirvana of Dr. Babasaheb Ambedkar 05.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण]]
[[चित्र:The ocean of people waving the mortal remains of Dr. Babasaheb Ambedkar towards the 'Chaitya Bhoomi', Mumbai, which had never been seen in the history (7 December 1956).jpg|thumb|आंबेडकरांची मुंबईतील अंत्ययात्रा, ७ डिसेंबर १९५६]]
[[चित्र:Chaitya Bhoomi, Mumbai – Samadhi place of Dr. Babasaheb Ambedkar.jpg|thumb|[[चैत्यभूमी]], आंबेडकरांचे समाधी स्थळ]]
 
[[नागपूर]] व [[चंद्रपूर]] येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते [[नेपाळ]]मधील [[काठमांडू]]ला 'वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट'च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' (बुद्ध की कार्ल मार्क्स) या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी [[गौतम बुद्ध|भगवान बुद्धांचा]] मार्ग [[कार्ल मार्क्स]] पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी [[बनारस]]मध्ये दोन भाषणे दिली. [[दिल्ली]]मध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, [[राज्यसभा|राज्यसभेच्या]] अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या 'भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स' या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी '[[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म]]' या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता [[६ डिसेंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]] रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव [[मुंबई]]ला आणण्यात आले. आंबेडकरांची कर्मभूमी असलेले मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मुंबईला येऊ लागले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=The Corporate Body of the Buddha Education Foundation|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=११ व १७५|language=मराठी}}</ref>
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी [[सम्राट अशोक]]ानंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=The Corporate Body of the Buddha Education Foundation|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१३८ - १५६|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरांची अंत्ययात्रा [[राजगृह]] (हिंदू कॉलनी), [[दादर]]वरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता [[चैत्यभूमी]]) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर [[मुंबई]] मध्ये [[बौद्ध संस्कृती|बौद्ध पद्धतींनी]] अंत्यसंस्कार करण्यातमराठी व इंग्लिश मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील 'राजगृह'या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबईतील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. [[भदंत आनंद कौसल्यायन]] यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.<ref name=":2">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false|title=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120830233|language=en}}</ref>
 
आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण|संकेतस्थळ=News18 Lokmat|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2020-01-20|language=hi}}</ref>
 
==संदर्भ==