"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३४:
 
२६ नोव्हेंबर १८४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिकी नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करुन तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार सिद्ध झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२५८|language=मराठी}}</ref>
 
==कायदा व न्यायमंत्री ==
[[File:Dr. Ambedkar being sworn in as Minister of Law, 1947. V. N. Gadgil sitting next to him and Sir Servapalli Radhakrishnan on the extreme right.jpg|thumb|300px|सप्टेंबर १९४७ मध्ये स्वंतत्र भारताचे कायदेमंत्री पदाची शपत घेताना बाबासाहब आंबेडकर. व्ही.एन. गाडगिळ त्यांच्या बाजूला बसलेले आणि [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] सर्वात उजवीकडे]]
 
[[File:Dr. Babasaheb Ambedkar being sworn in as independent India’s first Law Minister by President Dr. Rajendra Prasad, Prime Minister Jawaharlal Nehru looks on May 8, 1950.jpg|right|thumb|300px| मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणून शपत देतांना राष्ट्रपती [[राजेंद्र प्रसाद]] व सोबत पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]]]]
 
[[File:The first Cabinet of independent India.jpg|right|thumb|300px|३१ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपतींसह प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे छायाचित्र. मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बसलेल्यापैकी डावीकडून पहिले), मध्यभागी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, त्यांच्या उजवीकडे पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] व इतर मंत्री]]
 
१९४६ मध्ये आंबेडकर संविधान सभेच्या अनेक समित्यांवर सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या काळात ब्रिटिश लोकसभेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केला आणि भारतीय संविधान समिती सार्वभौम बनली. ३ ऑगस्ट रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली, त्यात आंबेडकरांचे नाव समाविष्ठ होते. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ब्रिटिश रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले. सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी शपत घेतली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=सुरवाडे|first=विजय|publisher=वैभव प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कल्याण जि. ठाणे|pages=४५|language=मराठी}}</ref> आंबेडकर संविधान निर्मिती करत असतानाच ते कायदा व न्याय मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडत होते. आंबेडकरांनी संविधानाचा अंतिम मसुदा मांडला व २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले. संविधानाची काही कलमे याच दिवशी आमलात आली. २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान पूर्णपणे अमलात आले व भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाहीचा देश बनला.
 
२७ सप्टेंबर १९५१ रोजी आंबेडकरांनी आपला मंमंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला होता पण १ ऑक्टोबर १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर १९५१ पर्यंत त्यांचा राजीनामा 'तहकूब' समजावा, कारण ६ ऑक्टोबर १९५१ रोजी लोकसभेत त्यांना आपल्या राजीनाम्यासंबंधी निवेदन करायचे होते व त्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारला जावा अशी त्यांची इच्छा. ४ ऑक्टोबर १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना कळवले की त्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. ठरल्याप्रमाणे ६ ऑक्टोबर १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु उपसभापतींनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतला हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटला. म्हणून ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६१|language=मराठी}}</ref> बाहेर आल्यानंतर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी काही कारणे दिली होती ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६१ व २६४|language=मराठी}}</ref>
 
==संदर्भ==