"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०२:
 
दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्टेशनजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने [[इ.स. १९२७]] च्या [[गणेशोत्सव|गणेशोत्सवात]] आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत समजावून सांगितले की, "''हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व मानुसकीचे वर्तन करू लागेल.''"<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४३|language=मराठी}}</ref>
 
 
=== मनुस्मृतीचे दहन ===
{{quote|
"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. [[मनुस्मृती]]चे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!"
|डॉ. बाबासाहेब आंबेडकर|<sub>इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान</sub><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=५६|language=मराठी}}</ref>}}
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या [[मनुस्मृती]]मुळे निर्माण झालेल्या आहेत. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले. आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.sabrangindia.in/article/towards-equality-why-did-dr-babasaheb-ambedkar-publicly-burn-manu-smruti-december-25-1927 | शीर्षक = Towards Equality: Why did Dr Babasaheb Ambedkar publicly burn the Manu Smruti on December 25, 1927? | भाषा = इंग्रजी | लेखक = | फॉरमॅट = सबरंग दिनांक २६ जानेवारी २०१६ }}</ref> [[शूद्र]]ांवर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत. स्मृतिकाराने [[अस्पृश्य]]ांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून [[मनुस्मृती]]चा उल्लेख केला जातो.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३|language=मराठी}}</ref>
 
* समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदली असावे.
* शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याची उपस्थितीत करू नये.
* इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.
* [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]], [[वैश्य]] यांच्या जीवासारखी [[शूद्र]]ाच्या जीवास एका कवडीची पण किंमत नाही. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.
* शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.
* शुद्राने कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर ते शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.
* सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये.
* वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्यांची मुक्ती आहे.
* उच्चवर्णियांनी शुद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत. शुद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिक्षा करावी.
* शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
 
[[File:Flyer published before Mahad Satyagraha in 1927.png|thumb|300px|महाड सत्याग्रहाचे प्रकाशित पत्रक]]
{{मुख्य|मनुस्मृती दहन दिन}}
आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४५, १४६ व १४७|language=मराठी}}</ref>
# चवदार तळ्यावर पाणी पिण्यासाठी अस्पृश्य बंधंनी वहिवाट पाडावी, म्हणून आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मिरवणुकीने सामुहिकपणे जाऊन चवदार तळ्याचे पाणी प्यावयाचे.
# हिंदू समाजातील व धार्मिक सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन करायचे. प्रतीकात्मक रीतीने हिंदूंतील सामाजिक विषमतेचे निर्मूलन करावयाचे.
 
पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पी.एन. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेऊन तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४८|language=मराठी}}</ref> मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी [[हिंदू धर्म]]ाला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना [[मार्टिन ल्युथर]]ने केलेल्या [[पोप]]च्या ([[ख्रिश्चन]] धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=५६|language=मराठी}}</ref> आंबेडकर अनुयायी दरवर्षी [[२५ डिसेंबर]] रोजी '[[मनुस्मृती दहन दिन]]' म्हणून आयोजित करतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2016/12/25/manusmriti-dahan-din-still-relevant/|title=Why Manusmriti Dahan Din Is Still Relevant {{!}} Feminism in India|date=2016-12-25|work=Feminism in India|access-date=2018-03-24|language=en-US}}</ref>
 
दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८-१० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४८ व १४९|language=मराठी}}</ref>
 
बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन कोर्टांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच तया जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७ चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४९ व १५०|language=मराठी}}</ref>
 
=== समाज समता संघ ===
[[File:Dr Babasabeb Ambedkar (front row, third from right) with members of the Samaj Samata Sangh in Bombay in 1927.jpg|thumb|right |300px|इ.स. १९२७ मध्ये मुंबई येथे समाज समता संघाच्या सहकार्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पहिल्या ओळीत उजवीकडून तिसरे)]]
 
४ सप्टेंबर १९२७ रोजी आंबेडकरांनी 'समाज समता संघ' नावाच्या नवीन संस्थेची स्थापना केली. याचे अध्यक्ष स्वतः आंबेडकर होते. या संघातर्फे त्यांनी रोटीबंदी व रोटीबंदी तोडण्याकरिता कार्य करण्याचे निश्चित केले. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजणाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजणाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी 'समता' नावाचे पाक्षिक सुरू केले. पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते पाक्षिक बंद पडले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४४|language=मराठी}}</ref>
 
या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरु होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४४|language=मराठी}}</ref>