"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८८:
 
१ जानेवारी १८२७ रोजी पुणे जिल्ह्यातील [[कोरेगाव भिमा|भीमा कोरेगाव]] येथील विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी [[महार रेजिमेंट|महार बटालियनच्या]] शौर्याचे कौतुक आंबेडकरांनी केले. बाबासाहेबांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे [[कोरेगावची लढाई|ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई]] झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे [[महार]] सैनिक लढले होते. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून [[पेशवे|पेशव्यांच्या]] ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले. अस्पृश्य जातीतील ज्या महार सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या हक्कासाठी या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभीमानाचे प्रतीक बनवले. २५ डिसेंबर १९२७ रोजी [[महाड]] येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणतात की, "''तूम्ही शूर विरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भिमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात''."<ref>https://www.bbc.com/hindi/india-42542280</ref><ref>https://www.bbc.com/hindi/amp/india-42598739</ref><ref> https://m.lokmat.com/pune/dr-babasaheb-ambedkar-gave-salute-vijaystambha-bhima-koregoan/amp/</ref><ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-42554568</ref>
 
 
=== महाडचा मुक्तिसंग्राम ===
{{मुख्य|महाड सत्याग्रह|चवदार तळे}}
[[चित्र:Bronze sculpture depicting Mahad water moment by B R Ambedkar.png|thumb|300px|[[महाड सत्याग्रह|महाड सत्याग्रहाचे]] नेतृत्व करत [[चवदार तळे|चवदार तळ्याचे]] पाणी प्राशन करतांना आंबेडकरांचे कांस्य धातुचे शिल्पचित्रण]]
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना [[इ.स. १९२७]] च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व [[मंदिर|हिंदू देवळांमध्ये]] प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७-१४१, १४५-१५०, १६१-१६५|language=मराठी}}</ref> संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. [[४ ऑगस्ट]] [[इ.स. १९२३]] रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर [[सीताराम केशव बोले]] यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात ४ ऑगस्ट १९२३ रोजी एक ठराव मंजूर करून घेतला. तो ठराव असा होता, "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२८|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2017/03/20/mahad-satyagraha/|title=The Significance Of Mahad Satyagraha: Ambedkar's Protest March To Claim Public Water {{!}} Feminism in India|date=2017-03-20|work=Feminism in India|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref> रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात दुसरा एक ठराव मांडला. तो ठराव असा होता, "ज्या [[नगरपालिका]] आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२८|language=मराठी}}</ref> या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील [[चवदार तळे]] अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२८|language=मराठी}}</ref> त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी [[महाड]] येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. त्यानिमित्ताने [[१९ मार्च]] व [[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षेखाली महाड येथे 'कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले' अशा नावाखाली परिषद भरवली आणि [[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी महाड येथे सामाजिक क्रांतीचे आंदोलन सुरु करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्यासाठी महत्त्वाचा संदेश दिला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२९|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2017/03/20/mahad-satyagraha/|title=The Significance Of Mahad Satyagraha: Ambedkar's Protest March To Claim Public Water {{!}} Feminism in India|date=2017-03-20|work=Feminism in India|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref>
 
[[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी आपला मोर्चा [[चवदार तळे|चवदार तळ्याकडे]] वळवला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील [[पाणी]] आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत आपापल्या ओंजळीने तळ्यातील पाणी प्राशन केले. पाणी प्राशन करुन आंबेडकरांनी सामाजिक क्रांतिच्या आंदोलनाचा सुरुवात केली. पण ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी हे अहिंसावादी होते, त्यांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली होती, खूप लोक जखमी झाले होते. 'अस्पृश्यांनी तळे बाटवले' असे म्हणून चवदार चळ्यात [[गोमूत्र]] टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करुन त्यांच्यावर खटला चालू केला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३०|language=मराठी}}</ref> आपला कायदेशीर, नागरी व मानवीय हक्क अमलात आणण्यासाठी आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना आपल्याबरोबर घेऊन सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. आंबेडकरांचा हा सत्याग्रह यशस्वी ठरला होता. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्र टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य लाभले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३१ व १३२|language=मराठी}}</ref>
 
=== शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग ===
[[मे ३|३ मे]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी मुंबईजवळ [[बदलापूर]] येथे [[शिवजयंती]] उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. आंबेडकरांनी [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. किर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून [[कीर्तन]] ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची [[पालखी]] आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली. हा सर्व वृत्तांत '[[बहिष्कृत भारत]]' च्या २० मे १९२७ च्या अंकात छापून आला होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३४, १३५ व १३६|language=मराठी}}</ref>
 
दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्टेशनजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने [[इ.स. १९२७]] च्या [[गणेशोत्सव|गणेशोत्सवात]] आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत समजावून सांगितले की, "''हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व मानुसकीचे वर्तन करू लागेल.''"<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४३|language=मराठी}}</ref>